अकोला: -हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली अकोला जिल्ह्यात संघटनेची बांधणी अधिक मजबूत करण्यासाठी महत्त्वपूर्ण नियुक्ती करण्यात आली आहे. युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या आदेशानुसार, पवन अरुण तायडे यांची युवासेना अकोला जिल्हा उपजिल्हाप्रमुख पदी निवड करण्यात आली आहे.
आमदार नितीन देशमुख आणि अकोला जिल्हाप्रमुख (युवासेना) सागर रामेकर यांच्या हस्ते पवन तायडे यांना नियुक्ती पत्र प्रदान करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी तायडे यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
या नियुक्तीमुळे अकोला जिल्ह्यातील युवासेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून, आगामी काळात पक्ष संघटन वाढवण्यासाठी पवन तायडे जोमाने कामाला लागतील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
---


0 Comments