Ticker

6/recent/ticker-posts

कारंजातील न्यू गोविंद स्कूलला आदर्श पुरस्कार प्राप्त .

 : कारंजा शहरातील नामांकित असलेल्या, चौधरी बंधुच्या, न्यू गोविंद इंग्लिश पब्लिक स्कूलला, शिक्षण क्षेत्रातील उत्कृष्ट कामगीरी, विविध सामाजिक उपक्रम, अतिरिक्त अध्यापन वर्ग, गोरगरीब होतकरू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत व जिजाऊ महोत्सव आदींचे मुल्यांकन करीत, "महाराष्ट्र इंग्लिश स्कूल ऑफ ट्रस्टीज असोसिएशनने" नुकताच "राज्यस्तरीय आदर्श उत्कृष्ट शाळा पुरस्कार" प्रदान केला आहे . प्राप्त माहितीन्वये शाळेचे अध्यक्ष तथा मुख्याध्यापक चौधरी बंधूनी हा पुरस्कार स्विकारला असून पुरस्काराचे स्वरूप उत्कृष्ट समानचिन्ह सन्मानपत्र असे होते.असे वृत्त महाराष्ट्र साप्ताहिक ग्रामिण पत्रकार परिषद वाशिम यांना प्राप्त झाल्याचे कळवीत असतांना संजय कडोळे म्हणाले  की, महाराष्ट्र शासनाचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री -ना . उदय सावंत, शालेय शिक्षण मंत्री - ना वर्षा गायकवाड, शालेय शिक्षण राज्यमंत्री ओमप्रकाश कडू, ऑस्ट्रेलियन शिक्षण संचालक एलन बलगाईच, मेस्ट्रोचे संस्थापक संजय तायडे पाटील यांचे हस्ते हा पुरस्कार न्यू गोविंद इंग्लिश पब्लिक स्कूल कारंजा यांना प्रदान करण्यात आला आहे . त्याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे . सदरहु शाळा स्थानिक जुन्या भाजी बाजार कारंजा येथे असून आपल्या अध्यापन कौशल्याने, उच्चभ्रू शिक्षण संस्थाशी प्रतिस्पर्धा करण्यात यशस्वी ठरल्याचे बोलल्या जात आहे .

Post a Comment

0 Comments