Ticker

6/recent/ticker-posts

कुटुंबातील विवाह सोहळा आनंदाचा क्षण ठरावा, फेब्रुवारी २०२३ च्या सर्वधर्गिय सामूहिक विवाह सोहळ्याचे वाशीम येथे आयोजन संजू आधार वाडे यांची पत्रकार परिषदेत माहिती


मंगरुळपीर, 
 वाशीम जिल्ह्याचा समावेश हा अकांक्षीत जिल्ह्यांच्या यादीत होतो. इथला शेतकरी, कष्टकरी, मजूरदार वर्ग आस्मानी व सुलतानी संकटांमध्ये भरडून निघत आहे. त्यातच कर्जबाजारीपणामुळे अनेक शेतकरी बांधव आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय घेतात. त्यामुळे उपवर मुला-मुलींचा विवाह घरात आनंदाचा सोहच्य वाटत नसून एक मोठी समस्या वाटत आहे. 
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शेतकरी नेते आमदाबादकर प्रमुख उपस्थिती मध्ये विठ्ठल रावजी गावंडे माजी नगरसेवक प्राध्यापक विरेंद्र सिंग ठाकूर राजेश पाटील, अरुण भाऊ इंगळे  कार्यक्रमाचे मुख्य संयोजक सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळ्याचे संजूभाऊ आधार वाडे

या बाबी पाहता जिल्ह्यात १० फेब्रुवारी (शुक्रवार) २०२३ ला वाशीम येथे सर्वधर्मिय सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार आहे. तरी समाजातील जास्तीत जास्त पात्र इच्छुक वर वधू मंडळींनी या विवाह सोहळ्यात सहभागी व्हावे असे आवाहन, तसेच हा विवाह सोहळा चला माझ्या लेकीच्या लग्नाला... या संकल्पनेखाली राबविण्यात येणार आहे. अशी माहिती सर्वधर्मिय सामूहिक विवाह सोहळा २०२३ चे मुख्यसंयोजक  आधार वाडे यांनी आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना दिली.
 मुख्यसंयोजक संजू आधार वाडे म्हणाले की, वाशीम जिल्ह्यात पार पडणारा हा सर्वधर्मिय सामूहिक विवाह सोहळा सुभद्राआई बहुउद्देशीय संस्था व इतर सामाजिक संस्था, संघटनांच्या माध्यमातून पार पडणार आहे. या सोहळ्यात तब्बल ५०० च्यावर वर-वधूंचे विवाह होणे अपेक्षीत आहे. यासाठी किमान ५० ते ६० हजार मान्यवरांची उपस्थितीत राहू शकते. या विवाह सोहळ्यामध्ये सहभागी वर-वधू पित्याला कुठल्याही प्रकारचा खर्च येणार नाही, त्यांना अपेक्षीत असलेले पाहुणे मंडळी ते निमंत्रीत करू शकतात. तसेच विवाहाच्या अगोदरील दिवस पर्यंत प्रत्येक धर्माच्या चालीरीती नुसार ते घरीच सर्व संस्कार पार पाडतील. विवाहाच्या दिवशी सहभागी वधू वरांचा विवाह त्यांच्या परंपरेनुसार धर्मगुरूंच्या उपस्थितीत पार पडणार आहे. या विवाह सोहळ्यात सहभागी वर-वधूंना त्यांचे धर्मगुरू, समाजिक कर्तुत्ववान व्यक्तीमत्व, ज्येष्ठ-थोरांचा आशीर्वाद देखील लाभणार आहे. हा विवाह सोहळा वाशीम जिल्ह्यातच नव्हे तर वऱ्हाड विभातील देखील अभूतपूर्व सोहळा ठरणार आहे. हा लग्न सोहळा म्हणजे चला माझ्या लेकीच्या लग्नाला... या संकल्पनेखाली राबविण्यात येणार आहे, अशी माहिती यावेळी बोलताना मुख्य संयोजक संजू आधार वाडे यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिली.

कोण कोण होऊ शकतो या विवाह सोहळ्यात सहभागी या सर्वधर्मिय सामूहिक विवाह सोहळ्यात वाशीम जिल्ह्यातील रहिवासी विवाहास पात्र इच्छुक वर ( २१ वर्षे पूर्ण) वधू (१८ वर्षे पूर्ण) सहभागी होऊ शकतात. तसेच वाशीम जिल्ह्यातील रहिवासी आहेत परंतु कामानिमित्त महाराष्ट्रात कोठेही राहतात. ज्यांची इच्छा आपल्या वाशीम जिल्ह्यात आपल्या पाहुण्यांच्या उपस्थितीत विवाह करण्याची आहे. असे प्रत्येक इच्छुक वर वधू या सामूहिक सर्वधर्मिय विवाह सोहळ्यात नोंदणी करून सहभागी होऊ शकतात. तसेच विधूर महिला पुरुष, अंतरजातीय विवाह सुद्धा या सोहळ्यात लावल्या जाणार आहे. त्यासाठी वयाचा पुरावा म्हणून मतदान, आधार कार्ड, विवाह नोंदणी फार्म भरणे, वर वधूचे पासपोर्ट साईजचे दोन फोटो, रहिवासासंदर्भात पोलिस पाटील, सरपंच, ग्रामसेवक, तलाठी यापैकी कुणाचाही एक दाखला / स्वघोषणापत्र आवश्यक राहणार आहे. या सर्व सहभागी पाहुण्यांच्या आदरतिथ्य आयोजक करणार असल्याचे सांगितले..
कोणाच्या सहभागातून पार पडणार हा विवाह सोहळा... या सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन सुभद्राआई बहुउद्देशिय संस्था, व्यापारी मंडळ वाशीम, तरुण क्रांती मंच वाशीम, माहेश्वरी वाशीम जिल्हा संघटना, कुरेशी समाज संघटना वाशीम, भारतीय जैन संघटना वाशीम, मराठा मंडळ संघटना वाशीम, संत सावतामाळी संघटना वाशीम, पदवीधर संघटना वाशीम, डॉक्टर असोसिएशन, मेडिकल असोसिएशन, बार असोसिएशन, युवा व्यापारी मंडळ, मारवाडी युवा मंच, अखिल भारतीय शिक्षक संघ वाशीम, एम. एच. ३७ ग्रुप वाशीम, धानोरकर फाऊंडेशन धानोरा, शाक्यमुनी मानव प्रतिष्ठाण, अक्सा हेल्थ क्लब मंगरुळपीर, शिवरत्न मित्र मंडळ मंगरुळपीर, निसर्ग स्पर्श फाऊंडेशन, वृत्तवाहिनी संघ वाशीम जिल्हा, मौलाना आझाद बहुउद्देशीय संस्था कोठारी मंगरुळपीर, राजपूत करणीसेना वाशीम जिल्हा, डॉ. पंजाबराव देशमुख अकादमी अमरावती, राष्ट्रीय खान्देश महासंघ, महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक संघटना, शिवराज मित्र मंडळ मंगरुळपीर (अनिल गावंडे), संत बिरबलनाथ महाराज संस्थान मंगरुळपीर (लालकुंवर रघुवंशी), व्यापारी असोसिएशन मंगरुळपीर ( जुगलकिशोर बियाणी) कर्मयोगी बाबुरावजी चौधरी बहुद्देशीय संस्था चेहेल, यांच्यासह अनेक सेवाभावी संघटनांच्या पुढाकारातून हा सर्वधर्मिय विवाह सोहळा पार पडला जाणार असल्याची माहिती यावेळी संजू आधार वाडे यांनी बोलताना दिली. त्याचबरोबर मंगरुळपीर तालुक्यातील सर्व पत्रकार मान्यवरांचा सन्मान करण्यात आला या कार्यक्रमाला मंगरुळपीर तालुक्यातील सर्व पत्रकार मंडळी विविध संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे संचालन वसंत दादा इंगोले प्राध्यापक अरुण इंगळे व आभार प्रदर्शन गौरवकुमार इंगळे राठोड यांनी केले


Post a Comment

0 Comments