Ticker

6/recent/ticker-posts

विधवा महिलेवर अत्याचार; तेल्हारा पोलीस ठाण्यात दाेघांवर गुन्हा दाखल

अकाेला : अकोल्यातील एका विधवा महिलेवर बळजबरीने अत्याचार केल्याची घटना नुकतीच उघडकीस आली आहे. संबंधित महिलेच्या तक्रारीनुसार  तेल्हारा पोलीस  ठाणे येथे दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पाेलिसांनी दिलेल्या माहितीनूसार विधवा महिलेच्या  तक्रारीनुसार दहा एप्रिलला रात्री १२ वाजता दाेघांनी बळजबरीने माझ्यावर अत्याचार केला. त्यानूसार अजय खारोडे (रा. अंबोडा, तालुका अकोट) व शाम विश्वासराव अढाऊ (रा. माळेगाव बाजार) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अजय खारोडे याने संबंधित महिलेस तिच्या घरातील खोलीत नेऊन तिच्यावर बळजबरी केली. तिने आरडाओरड केल्यामुळे तिचे नातेवाईक गोळा झाले असता दाेघांनी पळ काढला. या प्रकरणाचा तपास  उपविभागीय पोलीस अधिकारी रितू खोकर  करीत आहेत.

Post a Comment

0 Comments