मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज जिल्हाधिकाऱ्यांसोबत संवाद साधणार आहेत. यामध्ये राज्यात गर्दीच्या ठिकाणी मास्क अनिवार्य करण्याचा निर्णय होण्याची शक्यता आहे. याबाबत मुख्यमंत्री निर्णय घेतील, असं राजेश टोपे म्हणाले. देशात कोरोनाची रुग्णसंख्या वाढत आहे. त्याच पार्श्वभूमीवर आज पंतप्रधान मोदींनी मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा केली. त्यानंतर राजेश टोपे यांनी माध्यमांसोबत संवाद साधला. यावेळी ते बोलत होते.
कोरोनाच्या वाढत्या रुग्णांमुळे गर्दीच्या ठिकाणी पुन्हा मास्क अनिवार्य होण्याची शक्यता आहे. मास्क सक्ती नाही, असं म्हणता येणार नाही. दिल्लीत मास्क अनिवार्य करण्यात आला. महाराष्ट्रात मास्क अनिवार्य करण्याच्या दृष्टीने आज मुख्यमंत्री जिल्हाधिकाऱ्यांसोबत चर्चा करणार आहेत. त्यानंतर निर्णय घेण्यात येईल, असं टोपे म्हणाले. पंचसूत्रीनुसार कार्यवाही करण्याच्या सूचना केंद्रानं दिल्या आहेत. त्यानुसार आपण दररोज २५ हजार चाचण्या करत आहोत. महाराष्ट्र सुरक्षित झोनमध्ये आहे. घाबरण्याचं कुठलंही कारण नाही. राज्यात आज ९२९ सक्रीय रुग्ण आहेत. राज्याने एका दिवशी ६५ हजार सक्रीय रुग्ण बघितले आहेत. प्रति मिलियन रुग्णांमध्ये आपण खूप खाली आहोत. मिझोरम ६३५, दिल्ली २४८, केरळ ८२, हरियाणा ७३, कर्नाटक २८ आहे. दर दहा लाखामागे महाराष्ट्रात ७ रुग्ण आहे. काळजी घेऊन कार्यवाही करण्याच्या सूचना पंतप्रधानांनी दिल्या आहेत. आम्ही त्यानुसार कारवाई करू, असंही राजेश टोपे म्हणाले.रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळला तर त्याचं जिनोमिक सिक्वेंसिग देखील करू. सध्या देशात ओमायक्रॉनचे रुग्ण आढळून येत आहे. टेस्टींग, जिनोमिक सिक्वेसिंग, लसीकरण, ट्रॅकींग याप्रमाणे आपण कार्यवाही करू. तसेच लसीकरण वाढविण्यावर भर देऊ. ६-१२ या वयोगटातील मुलांना लसीकरण करण्याची
त्यासाठी स्पष्ट धोरण केंद्राने जाहीर केले नाही. पण, ते नियम आल्यानंतर आम्ही लगेच लसीकरण सुरू. १२-१५ वयोगटातील विद्यार्थ्यांचे शाळांना विश्वासात घेऊन लसीकरण वाढवणार आहोत, असंही टोपेंनी सांगितलं.

0 Comments