Ticker

6/recent/ticker-posts

"एस टी बस संपकाळात खाजगी वाहनांनी जगवीले." - संजय कडोळे .

   
कारंजा : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ कर्मचारी आणि कामगार वाहन चालक यांनी, ज्यावेळी स्वस्वार्थाकरीता, संपाचे हत्यार उपसून, महामंडळाची "लालपरी" बंद पाडली आणि सर्वसामान्यांना वेठीस धरले होते . त्यावेळी खाजगी वाहन आणि लक्झऱ्या रस्त्यावर धावत होत्या . त्यामुळे प्रवाशांची प्रवासाची व्यवस्था होऊ शकली . अन्यथा सामान्य प्रवाशांनी काय करायचे होते ? "खाजगी लक्झऱ्या सुरु राहणे ही सुद्धा, प्रवाशांची प्रचंड लोकसंख्या बघता आजच्या काळाची गरजच आहे. निव्वळ एस टी बसेसच्या भरवश्यावर लोकांचा प्रवास होऊच शकत नाही." मात्र खाजगी वाहन व लक्झरी चालकांनी शासकिय नियमाचे पालन करीत प्रवाशांना सेवा देणे जरूरी असून, आपली वाहने चुकूनही बसस्थानक परिसरात नेऊ नयेत व बसस्थानकावरील प्रवाशांना स्थलांतरीत करून आपल्या वाहनात घेऊ नये. तसेच वाजवीपेक्षा प्रवाशी कोंबून भरणे. प्रवाशांच्या वेळेचा अपव्यय करणे.  असले प्रकार जर त्यांनी टाळले व प्रवाशांना पारदर्शी सेवा देणे जर सुरु केले तर खाजगी बसवाहतूकीवरील प्रवाशांचा विश्वास निश्चितच वाढू शकतो . व महामंडळावरील ताण कमी करण्यास  चांगला सक्षम पर्याय ठरू शकतो . असे आपल मत असल्याचे महाराष्ट्र साप्ताहिक ग्रामिण पत्रकार परिषदेचे जिल्हाध्यक्ष संजय कडोळे यांनी व्यक्त केले आहे . तसेच खाजगी लक्झरी व किरकोळ खाजगी वाहनांवर नियंत्रण व लक्ष्य ठेवण्याकरीता आर टी ओ कार्यालयामार्फत प्रत्येक तालुक्यात तालुका नियंत्रण अधिकारी असले पाहिजे असे सुद्धा आपल्या प्रसिद्धी पत्रकाद्वारे त्यांनी म्हटले आहे .
[4/28, 3:10 PM] संजय कडोळी कारण: लक्झरीच्या फोटोसह प्रसिद्ध करावी .

Post a Comment

0 Comments