कारंजा : वाशिम जिल्हा, महाराष्ट्र साप्ताहिक ग्रामिण पत्रकार परिषदेचे उपाध्यक्ष तथा सर्वधर्मसमभाव एकात्मिक समिती सदस्य, गवळी समाजाचे मोहम्मद लक्ष्मण मुन्निवाले यांची सात वर्षिय बालिका, कु . मुस्कान मोहम्मद मुन्निवाले हिने, पवित्र रमजान महिन्यानिमित्त, आपल्या आयुष्यतिल पहिला रोजा काल यशस्वीपणे पूर्ण केला . रोजा म्हणजे अखंड दिवस अल्लाहच्या प्रार्थनेकरीता, पाणी सुद्धा न पिता निराहार राहणे होय . आपल्या रोजाविषयी बोलतांना बालिका कु मुस्कान मुन्निवाले म्हणाली . रोजामुळे मला नवचैतन्य मिळाले असून परमानंदाची अनुभूती होत आहे . त्याबद्दल तिचे सर्वत्र कौतुक होत असून तिचे मम्मी पापा, भाऊ तन्विर, युसूफ, मुन्ना आणि समाजबांधवासह पत्रकार मंडळींनी अभिनंदन केले आहे .
0 Comments