दि. 07.05.2022 रोजी शासनाच्या वतीने घेण्यात आलेल्या राष्ट्रीय लोक अदालतमध्ये वाशिम जिल्हा पोलीस दलाची उल्लेखनिय कामगिरी, एकून 1238 न्यायप्रविष्ठ प्रकरणे निघाले निकाली
शासनाच्या वतीने दोषसिध्दीचे प्रमाण वाढविणे करीता वारंवार शासन परिपत्रके/मार्गदर्शक सुचना प्राप्त होतात. त्या अनुषंगाने वाशिम जिल्हा मा.पोलीस अधिक्षक, श्री. बच्चन सिंह यांनी आपले अधिनस्त सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी तसेच सर्व पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी यांना वारंवार सुचना, मार्गदर्शन करुन शासनाचे परिपत्रकांचे कटाक्षाने अनुपाल होणे करीता जिल्ह्याचे ठिकाणी स्थापीत TMC सेल वाशिमचे मार्फतीने सर्वोतोपरी पर्यत्न सुरु ठेवले आहेत. त्यामुळे वाशिम जिल्ह्यातील सर्व पो.स्टे. च्या वतीने न्यायप्रविष्ठ करण्यात आलेल्या प्रत्येक गंभीर व किरकोळ प्रकणाचा जातीने पाठपुरावा करण्यात येत आहे.
दि.०७.०५.२०२२ रोजी शासनाच्या वतीने राष्ट्रीय लोक अदालतचे आयोजन करण्यात आले होते. त्याअनुषंगाने वाशिम जिल्ह्यातील सर्व पो.स्टे. कडून न्यायप्रविष्ट करण्यात आलेल्या जास्तीत जास्त प्रकरणांचा निपटारा होणे करीता व त्या व्दारे वाशिम जिल्ह्याचे दोषसिध्दीचे प्रमाणात वाढ होणे करीता पोलीस अधिक्षक श्री. बच्चन सिंह सर यांच्या सुचना व दिलेले लक्ष पुर्णत्वास नेणे करीता मागील १५ ते २० दिवसांपासून सतत पर्यत्न करुन लोक अदालत अनुषंगाने मा. न्यायलायाकडून काढण्यात आलेल्या १२७३ येवढ्या समन्सची पोलीसांकडून बजावणी करण्यात येवून प्रत्यक्ष लोक अदालतमध्ये पुढील प्रमाणे गुन्ह्यातील आरोपीतांना मा. न्यायालयात दोषसिध्दी प्राप्त झाली आहे.
दोषारोपचे एकून ७०४ न्यायप्रविष्ट प्रकरणे निकाली निघाले असून त्या सर्वच प्रकरणांमध्ये दोषसिध्दी होऊन २,३१,७००/- येवढा दंड मा. न्यायालयाचे वतीने आकारण्यात आला आहे. त्याच प्रमाणे मोटार वाहन कायद्याचे एकून ५२८ प्रकरणात १,७५,७००/- येवढा दंड तसेच इतर ६ प्रकरणात १,०००/ रुपये दंड अशा एकून वरील प्रमाणे १२३८ न्यायप्रविष्ठ प्रकरणात ४,०८,४००/- येवढा दंड मा.न्यायालयाचे वतीने आकारण्यात आला आहे. यामध्ये अनुक्रमे पो.स्टे. कारंजा शहर, पो.स्टे. मंगरुळपीर, पो.स्टे.मालेगांव, पो.स्टे.मानोरा, पो.स्टे. कारंजा ग्रामीण यांची कामगिरी उल्लेखनिय झाल्याचे दिसून येते.
वरील प्रमाणे उल्लेखनिय कामगिरी करीता पोलीस अधिक्षक श्री. बच्चन सिंह यांचे मार्गदर्शनात अपर पोलीस अधिक्षक श्री. गोरख भामरे, उप. वि.पो.अधि., श्री. पुजारी, उप. वि.पो.अधि. श्री. केडगे, उप.वि.पो.अधि., पांडे तसेच जिल्ह्यातील सर्व पो.स्टे. प्रभारी अधिकारी व जिल्ह्यातील सर्व JMFC कोर्ट पैरवी अंमलदार, सर्व समन्स तामीली अंमलदार आणि जिल्हा TMC सेलचे श्री. भारत लसंते व त्यांचे सहकारी पोहेकॉ./ १२५ संतोष निखाडे, नापोकॉ/९४० विष्णु मोटे, पोकॉ/१२१८ दिपक गिरी यांनी वाशिम जिल्ह्याचे दोषसिध्दीचे प्रमाणात वाढ होणेसाठी सर्वोतोपरी प्रयत्न करुन उल्लेखनिय कामगिरी केली आहे.


0 Comments