Ticker

6/recent/ticker-posts

शेतकरी मित्र मा. श्री प्रल्हाद शेळके यांचा कार्यगौरव नागरी सत्कार सोहळा संपन्न


   वाशिम खबर आवाज महाराष्ट्राचे     संपादक सुधाकर चौधरी



मंगरुळपीर तालुक्यातील सर्व शेतकारी बांधवाचे प्रेरणास्थान असणारे शेतकरी मित्र मा. श्री प्रल्हाद सदाशिवरावजी शेळके कृषि अधिकारी (पं.स.) मंगरूळपीर यांचा कार्य गौरव  पत्नी सह सत्कार सोहळा प्राध्यापक विरेंद्र सिंग ठाकूर यांच्या शेतात हर्ष उल्हासात संपन्न करण्यात आला 
या कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. श्री चंद्रकांतजी ठाकरे (अध्यक्ष जि.प. वाशिम),  प्रमुख मार्गदर्शक मा. श्री एकनाथरावजी डवले (भा.प्र.से.) प्रधान सचिव , मा. श्री. लक्ष्मीकांतजी महाकाळ
(माजी सभापती जि.प.वाशिम),
 मा. श्री विलास रेहनापुरकर साहेब (संचालक म.रा.बिज प्रमाणीकरण यंत्रणा अकोला),
 मा. श्री दिवेकर साहेब , मा. श्री शंकरजी तोटावार (जिल्हा कृषी अधिक्षक वाशिम), मा. श्री पि.व्ही. उन्हाळे साहेब (विभागीय अधिकारी बिज प्रमाणीकरण यंत्रणा, अकोला) , मा. श्री विलासजी बंडगर (कृषी विकास अधिकारी जि.प.वाशिम),मा श्री सुनीलजी हूड मंगरूळपीर ठाणेदार,
मा. श्री सुरेशजी कांबळे (गटविकास अधिकारी मंगरुळपीर)
मा. श्री. वसंतराव पाटील शेगीकर
, मा.श्री.गुणवंतराव पाकधने
(माजी अध्यक्ष ख. वि. संघ मंगरुळपीर), मा. श्री नारायणरावजी बारड (से.नि. मंगरुळपीर) मा. श्री रविंद्रजी इंगोले साहेब (सत्कारमुर्ती) (ता  कृषि अधिकारी मंगरुळपीर ),
विजयभाऊ चव्हाण बुलढाणा, अनिल पाटील राऊत वनोजा , भाऊसाहेब काळे इत्यादींची मोठ्या संख्येने मंचावर उपस्थिती होती.











मंचावरील मान्यवरांचा शाल श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला



शेळके ताई यांचा शाल श्रीफळ देऊन सन्मान





अध्यक्षीय मनोगत - 
मा. श्री चंद्रकांतजी ठाकरे (अध्यक्ष जि.प. वाशिम),  प्रमुख मार्गदर्शक मा. श्री एकनाथरावजी डवले (भा.प्र.से.) प्रधान सचिव ,
 या कार्यक्रमाप्रसंगी विविध मान्यवरांनी आपले विचार व्यक्त केले
 कृषि अधिकारी यांचा कार्य गौरव  पत्नी सह करणे म्हणजे केलेल्या कार्याची पावती वेळो-वेळी  शेतकऱ्यांना सहकार्य केले शेतकऱ्यांच्या समस्या समजून घेतल्या आणि त्यांच्या अडचणीत मदत केली आपल्या परिवारातील कुटुंब असल्याचे समजून शेळके यांनी कार्य केले त्याची परतफेड म्हणून हा कार्यक्रम  मोठ्या थाटात साजरा होत आहे.






मा.श्री.प्रल्हादजी शेळके साहेबांचा सामुहीक नागरी सत्कार डॉ. हर्षद ठाकुर व डॉ. सौ. विशाखा ठाकुर व्दारा ज्ञानेश्वर माऊलीची मुर्ती शाल श्रीफळ देऊन करण्यात आला या कार्यक्रमाचे औचित्य साधत शायर व सकाळ ॲग्रोवन कट्टा मं.पीर चे रशिद शादाँ- गझल भेट सन्मानपत्र -  निलेश तुळजापुरे, मंगरूळपीर, मानोरा ,कारंजा ,वाशिम ,बुलढाणा, यवतमाळ, नांदेड, इत्यादी ठिकाणावरून आलेल्या शेतकऱ्यांनी सुधा सन्मान केला




सत्कारमुर्ती मा. रविंद्रजी इंगोले यांचा परिचय सुधिरभाऊ घोडचर यांनी दिला  व नागरी सत्कार शेतकऱ्यांचे मनोगत श्री दिलीप फुके, श्री रामेश्वरजी टेकाडे, श्री कुलदीप पाटील , माजी नगराध्यक्ष प्रा. विरेंद्रसिंह ठाकुर सर,




 सत्कारमुर्ती मा. श्री प्रल्हादजी शेळके यांचे मनोगत हर्ष उल्हास आच्या वातावरणात त्यांनी व्यक्त केले. 



या कार्यक्रमासाठी शेळके यांच्या मातोश्री उपस्थित ठिकाणी यांचासुद्धा सन्मान करण्यात आला.






या कार्यक्रमासाठी पंचक्रोशीतील शेतकऱ्यांनी व विविध जिल्ह्यातून आलेल्या मान्यवरांनी उपस्थिती दर्शविली होती.
या कार्यक्रमाचे संचालन सुनील भाऊ मालपाणी यांनी केले तर
आभार प्रदर्शन श्री. प्रविण ठाकरे यांनी केले 


Post a Comment

0 Comments