---- ब्रेकींग ----
⏩ विहीरीत मिथेन सारखा वायु असल्यावरही मंगरूळपीर शाखेच्या संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाच्या जवानांनी लावली बाजी चक्क विहीरीत उतरुन धाडसाने पॅकअप करुन यशस्वी केले रेस्क्यु ऑपरेशन
⏩ मंगरूळपीर येथील सिव्हील रोडवरील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील घटना
⏩ घटना वेळ
6 मे 2022 दुपारी 12:00 वाजता.
⏩ घटनाक्रम.. कीशोर कदम यांच्या घराजवळील सिव्हील लाईन रोड छत्रपती शिवाजी महाराज चौक मंगरूळपीर* येथील अरुंद असलेल्या विहीरीत एक मोठा वळु आणी एक गाय पडल्याची माहिती मानवसेवा आपत्ती व्यवस्थापन फाऊंडेशनच्या संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथक शाखा मंगरूळपीर च्या जवानांना नगरपरिषद कार्यालयातुन सदर घटनेची देण्यात आली तेव्हा लगेच संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथक पिंजर शाखा मंगरूळपीर चे अतुल उमाळे,गोपाल गीरे, गोपाल जयस्वाल,अपूर्व चके,सुमित मुंधरे,योगेश कावरे,हे शोध व बचाव साहीत्यासह घटनास्थळी दाखल झाले आणी आपल्या पथकाचे प्रमुख दीपक सदाफळे यांना स्पाॅटवरील विडीयो क्लिप पाठवुन माहिती दीली पुढील कार्यवाही करण्यासाठी मार्गदर्शन घेतले यावेळी विहीर ही अरुंद आणी अंदाजे 55 फुट खोल आणी 20-25 खोल पाणी असलेल्या विहीरीतुन दोन्ही वळु आणी गाईला विहीरीत उतरुन पॅकप केले आणी नगरपरिषद येथील ट्रॅक्टरच्या सहाय्याने सुखरुप बाहेर काढले. यावेळी नगरपरिषद मंगरूळपीर चे अधिकारी कर्मचारी आणी गणेश ढगे जिल्हा संत्सग प्रमुख, गजानन हीवरकर, विजय डाखोरे,आणी स्थानिक नागरिकांनी मोठे सहकार्य केले अशी माहिती पथकाचे सेवक अतुल उमाळे यांनी दीली आहे.
0 Comments