Ticker

6/recent/ticker-posts

लक्ष्य कार्यक्रमांमध्ये ग्रामीण रुग्णालय मंगरूळपीर ला मिळाले राज्यस्तरीय मानांकन

राष्ट्रीय आरोग्य अभियाना अंतर्गत राज्यपातळीवर प्रसूती सेवा साठी गुणात्मक सर्वे लक्ष्य या कार्यक्रमा अंतर्गत वर्ष 2020 2021 साठी राबविण्यात आला होता, ज्यामध्ये दर महिन्याचे प्रसूती चे प्रमाण व प्रसूती दरम्यान व प्रसूती नंतर देण्यात येणाऱ्या सेवाचा गुणात्मक आढावा घेण्यात आला, त्या आढावा अंती राज्य स्तरांमधून 16 शासकीय रुग्णालयांना राज्यस्तरीय मानांकन देण्यात आले, ग्रामीण रुग्णालय मंगरूळपीर येथे वर्ष 2020 2021 च्या दरम्यान एकूण 536 प्रसूती करण्यात आल्या,
त्याआधारे ग्रामीण रुग्णालय मंगरूळपीर ला राज्यस्तरीय मानांकन मिळाले आहे डॉ, रूचा घुनागे( स्त्री रोग तज्ञ) सध्या या रुग्णालयात कार्यरत असल्यामुळे साध्या व गुंतागुंतीचे प्रसूती तसेच 10 आठवड्या पर्यंतचे गर्भपात येते करण्यात येते या कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता  डॉक्टर खान, डॉक्टर घुंगे ,सोळंके सिस्टर ,व इतर सर्व अधिपरिचारिका आयुष वैद्यकीय अधिकारी डॉक्टर इंगळे, डॉक्टर अजमल , श्री रमेश आडे, श्री जावेद पारूकी, प्रकाश संगत या सर्व कर्मचाऱ्यांनी मोलाचे सहकार्य केले

Post a Comment

0 Comments