Ticker

6/recent/ticker-posts

हवामान विभागाकडून आनंदाची बातमी, ‘या’ तारखेला महाराष्ट्रात दाखल होणार मान्सून!

राज्यातील खरीप हंगामपूर्व आढावा बैठकीमध्ये हवामान विभागाचे होसाळीकर यांनी राज्यातील मान्सूनच्या आगमनासंदर्भात महत्त्वाची माहिती दिली आहे.


गेल्या तीन महिन्यांपासून जवळजवळ संपूर्ण महाराष्ट्रात उन्हाच्या काहिलीमुळे मेटाकुटीला आलेल्या नागरिकांसाठी हवामान विभागानं आनंदाची बातमी जाहीर केली आहे. नैऋत्य मोसमी पावसाचं अर्थात मान्सूनचं अंदमानमध्ये अर्थात बंगालच्या उपसागरात १६ मे रोजीच आगमन झालं आहे. याशिवाय केरळमध्ये येत्या १७ मे रोजीच पावसाचं झोकात आगमन होणार असल्याचं देखील हवामान विभागाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. राज्यातील खरीप हंगामापूर्वी घेण्यात आलेल्या आढावा बैठकीमध्ये भारतीय हवामान विभागाचे के. एस. होसाळीकर यांनी ही माहिती दिली आहे. संपूर्ण महाराष्ट्र ज्याची आतुरतेनं वाट पाहात आहे, त्या मान्सूनचं महाराष्ट्रात नेमकं कधी आगमन होणार आहे, याविषयी देखील होसाळीकर यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे.

या बैठकीमध्ये राज्यातील खरीप हंगामाचा आढावा घेण्यात आला. या हंगामासाठी आवश्यक असणारा पाऊस यंदा होईल की नाही, याविषयी होसाळीकर यांच्याकडे विचारणा केली असता संपूर्ण महाराष्ट्रात समाधानकारक पाऊस होईल, असा अंदाज होसाळीकर यांनी या बैठकीत व्यक्त केला आहे.

Post a Comment

0 Comments