दि. २८.०५.२०२२
समाजामध्ये शांतता व सुव्यवस्था नांदावी व कायद्याचे राज्य अबाधित राखावे यासाठी वाशिम जिल्हा पोलीस दल सदैव दक्ष असून कायद्याचे पालन न करणाऱ्यांविरोधात सतत कडक कायदेशीर कारवाईचा सपाटा सुरु आहे. काही असामाजिक घटक समाजाची शांतता भंग करण्यासाठी व जनतेमध्ये दहशत निर्माण करण्यासाठी शस्त्रांचा वापर करतात. त्याच्याविरोधात शस्त्र अधिनियम १९५९ अन्वये कारवाई करण्यात येते. या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक श्री. बच्चन सिंह (IPS) यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली काल वाशिम घटकात पो.स्टे. वाशिम शहर व पो.स्टे. कारंजा हद्दीत ०२ इसमांवर विनापरवाना घातक धारदार शस्त्र बाळगत समाजामध्ये धाक, दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी कलम ४, २५ शस्त्र अधिनियम, १९५९ अन्वये कारवाई करण्यात आली.
पो.स्टे. वाशिम शहर हद्दीत लक्झरी बस स्टैंड परिसरात एक युवक धारदार चाकू घेऊन फिरत आहे व चाकूचा धाक दाखवून लोकांमध्ये जरब बसवीत आहे अश्या मिळालेल्या माहितीवरून पो.स्टे. वाशिम शहरचे पोहेकॉ./३४७ श्रीवास्तव, पोना./८५६ नागरे, पोका./२४३ महाले व पोकॉ./३०३ वाकुडकर यांनी •लक्झरी बस स्टैंड परिसरातील हॉटेल इस्लामी समोरून एका युवकास संशयास्पद स्थितीत फिरतांना दोन पंचांसमक्ष ताब्यात घेतले व त्याच्याकडून एक लोखंडी खंजीर जप्त केला. सदर युवकाजवळ शस्त्र बाळगण्याचा कुठलाही परवाना नसतांना घातक धारदार शस्त्र मिळून आल्याने सदर युवकावर पो.स्टे. वाशिम शहर येथे अप. क्र. ४२०/२२ नुसार कलम ४, २५ शस्त्र अधिनियम अन्वये कारवाई करण्यात आली. तर पो.स्टे. कारंजा शहर हद्दीतील भारतीपुरा येथे एक इसम विनापरवाना अवैधरीत्या घातक धारदार तलवार बाळगीत असल्याची बातमी मिळाल्यावरून पो.स्टे. कारंजा शहर येथील पथकाने धाड टाकून आरोपी
कारंजा शहर - शेख इमरान शेख निसार
वाशिम शहर - तुषार मनोहर वाघमारे
तलवारीसह ताब्यात घेतले. सदर इसमावर विनापरवाना धारदार शस्त्र बाळगल्याप्रकरणी पो.स्टे. कारंजा शहर येथे अप.क्र. २८२/२२ कलम ४, २५ शस्त्र अधिनियम सहकलम ३७ (१) (३), १३५ मपोका अन्वये कारवाई करण्यात आली आहे.
वर्षभरात पो.स्टे. रिसोड, पो.स्टे. अनिसिंग, पो.स्टे. मानोरा येथे प्रत्येकी ०१ कारवाई व पो.स्टे. वाशिम शहर व पो.स्टे. कारंजा शहर येथे प्रत्येकी ०२ कारवाया अशा एकूण ०७ कारवाया शस्त्र अधिनियम, १९५९ अन्वये कारवाया करण्यात आल्या आहेत. नागरिकांनी अश्याप्रकारे विनापरवाना शस्त्र बाळगीत समाजामध्ये भीतीचे वातावरण निर्माण करू पाहणाऱ्या इसमांविरुद्ध न घाबरता समोर येऊन तक्रार देण्याचे आवाहन वाशिम जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. बच्चन सिंह (IPS) यांनी केले आहे.
0 Comments