Ticker

6/recent/ticker-posts

मंगरूळपीर येथे नगर परिषद शाळा व जिल्हा परिषद हायस्कूल मध्ये शिकलेल्या माजी विद्यार्थ्यांचा ग्रेट भेट

मंगरूळपीर येथील नगर परिषद शाळा क्रमांक 2 व जिल्हा परिषद हायस्कूल येथे शिक्षण घेऊन वेगवेगळ्या शहरांमध्ये वास्तव्य करून नोकरी-व्यवसाय सांभाळणार्‍या  माजी विद्यार्थ्यांचाआज शनिवारी 28 मे रोजी जिल्हा परिषद हायस्कूल मंगरूळपीर येथे ग्रेट भेट सर्वांची थेट सोहळा जिल्हा परिषद हायस्कूल ला सन 1989 ते 1995 च्या बॅचमध्ये एकाच वर्गातील माजी विद्यार्थ्यांचा सोहळा आज मोठ्या थाटात संपन्न झाला असून  तत्कालीन  शिक्षक श्री सुभाष पवणे , प्राचार्य
 दिलीप आंबेकर, श्री . काळमेघ सर, श्री मानेकर सर , श्री खांबलकर सर , सौ पाटील मॅडम , सौ राऊत मैडम , श्री लोहिया सर, सौ रोहीणी मनवर मॅडम, सौ मनुबाई  आरू मँडम , खोडके सर आदी शिक्षक वृंदाचा शाल  पुष्पगुच्छ व श्री ची प्रतिमा भेट देऊन सत्कार करण्यात आला यावेळी माजी विद्यार्थ्यांनी नतमस्तक होऊन आशीर्वाद  घेतला . या अविस्मरणीय ग्रेट भेट सर्वाची भेट सोहळ्याचा योग  श्री कवीश्वर पाकधणे व सोनाली लोखंडे यांनी घडवून आणला त्याबद्दल त्यांचा सुद्धा यावेळी सत्कार करण्यात आला . कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन व अभिवादन करून करण्यांत आली . कार्यक्रमाचे प्रास्ताविक सतिश भातकुले यांनी केले . तर कार्यक्रमाला प्रामुख्याने मंगरुळपीर पंचायत समीतीचे गटशिक्षणाधिकारी श्री सुभाष पवणे , व श्री बंकटलाल लोहिया आणी श्री दिलीप आंबेकर प्राचार्य जिल्हा परिषद हायस्कूल यांनी मार्गदर्शन केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रतिभा पाकधने व रुपेश धोटे  यांनी केले व आभार प्रतिभा पाकधने यांनी मानले . तर कार्यक्रमाला माजी विद्यार्थी
 विरेंद्र अर्धापुरकर, गजानन जयस्वाल,  सतीश भातकुले, केदार खपली ,भूषण लांडगे ,गौरव रघुवंशी, रवींद्र होनाळे ,रुपेश धोटे, सोनाली येळणे ,प्रतिभा पाकधने ,योगेश क्षिरसागर ,राहुल कोठारी, आनंद जोशी ,गोविंद जाखोटिया ,अनिल दुर्गे ,पूजा राठी ,निलेश बाबरे,
प्रगती मुळे, निलेश बाहेती, संजय जुटावत, गिरीश मिसाळ, अजय तुरे ,सचिन खेडकर, हरिष जोगे, जयश्री परळीकर , रितेश मडगे, डॉ. आशिष खोडके ,जितेन्द्र बजाज, सुशिल सपकाळ, अँड.. हर्षद राठी ,समीक्षा मनवर, सुमेध मनवर,नाना गोगरकर,
उज्वल जाधव,रवि मुंढरे यांची उपस्थीती होती .

Post a Comment

0 Comments