Ticker

6/recent/ticker-posts

नांदखेडा सेवा सहकारी सोसायटी निडणुक ,कास्तकार पॕनल एकतर्फी विजयी

मंगरुळपीर तालुक्यातील नांदखेडा येथील सेवा सहाकारी संस्था र.न.४७२ ची निवडणूक पार पडली. अतिशय चुरशीच्या व संपुर्ण तालुक्याचे लक्ष लागलेल्या या निडणुकीत ग्रामपंचायत सत्ताधारी व कास्तकार पॕनल यांनी आपापली प्रतिष्ठा पणाला लावली होती.
निकालाअंती सत्ताधारी पॕनलला धुळ चारत कास्तकार पॕनलने ७५% मतदान घेत १३ जागेवर एकतर्फी विजय मिळवला. तालुक्यात असणाऱ्या ६६ सेवा सहकारी संस्थामध्ये ४७ संस्था अविरोध झाल्या तर १९ संस्थांच्या निवडणूका झाल्या. बरेच ठीकाणी सर्वपक्षीय कार्यकर्यांनी आपसात जागा वाटप करुन सहकारी संस्था अविरोध केल्या तर निवडणूक झालेल्या ठीकाणी पक्षीय बलाला संमिश्र प्रतिसाद मिळाला. परंतु निवडणूकीच्या रिंगणात प्रत्यक्ष सहभाग घेत पांडुरंग जायभाये यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने एकतर्फी विजय मिळवत सत्ताधाऱ्यांचे पानिपत केले. यात शेषराव जायभाये, माधवराव जायभाये, विठ्ठल ठोंबरे, रामचंद्र लठाड सैफुल्लाखान रशिदखान, रस्सुलशहा रहिमशा, उत्तम. इंगोले, भिमराव सिरसाठ, गोवर्धन भगत , जमिलाबी रस्सुलशहा, लता पांडुरंग जायभाये , डॉ. आदित्य पांडुरंग जायभाये , डॉ. प्राची पांडुरंग जायभाये यांनी विजयश्री प्राप्त केला.

Post a Comment

0 Comments