Ticker

6/recent/ticker-posts

अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणान्या आरोपीस १० वर्ष कारावासाची शिक्षा


पोलीस स्टेशन मंगरूळपीर येथे दिनांक ३१/०८/२०१७ रोजी फिर्यादी  रा. गोलवाडी ता. मंगरुळपोर जि. वाशिम हिने फिर्यादी दिली को, गुन्हयातील फिर्यादीची मुलगी पिडीत हीस आरोपी नामे प्रकाश लालसिंग चव्हाण रा. | गोलवाडी ता. मंगरूळपीर याने पकडून शेताजवळील नाल्यात नेवून तिच्या सोबत जबरदस्ती करून लघवी करायचे जागेत त्याची सु करायची जागा टाकली असा प्रकार आरोपीने ३ वेळा केल्याने फिर्यादीचे मुलीस गर्भधारणा झली तसेच कोणाला काही सांगीतल्यास
जिवाने मारण्याची धमकी दिली अशा फिर्यादीचे रिपोर्ट वरन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्हयाचे तत्कालीन तपास अधिकारी पो.उप.नि. असद खाँ पठाण व त्यांचे लेखनिक पो.कॉ. विनोद चित्तकवार बने ७९३ व पो.कॉ. सुनिल गंडाईत च नं. २८३ यांनी गुन्हयाचा सखोल साक्षी पुराव्यासह तपास करून गुन्हयाचे दोषारोप पत्र क्र १०५/२०१७ दिनांक २३/११/२०१७ अन्वये मा. सत्र न्यायालय वाशिम येथे दाखल केले. गुन्हयाचा सि.सि.नं. स्पेशल चाईल्ड केस नं. १८/२०१७ असा आहे,

सदर गुनायाचा कोर्ट केस नं. १८/२०१७ चा खटला जिल्हा व सत्र न्यायालय मंगरुळपीर येथे मा. न्यायाधिश रचना आर. तेहरा

मॅडम यांच्या समक्ष दिनांक २३/०५/२०२२ पायेतो चालला मा. न्यायाधिश तेहरा मॅडम यांनी दोन्ही पक्षाची बाजू एकून घेवून आरोपी

प्रकाश लालसिंग चव्हाण रा गोलवाडी ता. मंगरुळपीर यास १० वर्ष शिक्षा व ५००० दंड व दंड न भरल्यास ६ महीने कारावास

अशा प्रकारे शिक्षा सुनावली आहे. सदर गुन्हयाचा तपास पो.उप.नि. असद खाँ पठाण व त्यांचे लेखनिक यांनी योग्य रित्या करून

गुन्हयातील फिर्यादीस न्याय मिळवून दिला..

सदर प्रकरणी सरकार तर्फे सहायक सरकारी अभियोक्ता अँड श्री. पी. एस. दोबळे यांनी काम पाहीले तर मा. पोलीस अधिक्षक बच्चनसिंह, अपर पोलीस अधिक्षक गोरख भामरे, उपविभागीय पोलीस अधिकारी यशवंत कंडगे, पोलीस निरीक्षक सुनिल हूड यांच्या | मार्गदर्शनात कोर्ट पेरवी अधिकारी म्हणून ना.पो.कॉ. गफुर पाले व नं. ११८३ यांनी कामकाज पाहीले आहे.

Post a Comment

0 Comments