Ticker

6/recent/ticker-posts

जे.सी.आय. मंगरूळ नाथ च्या वतीने आदर्श महिलांचा मातृदिनानिमित्त सन्मान

जे.सी.आय. मंगरूळ नाथ यांनी केला अनोखा प्रयत्न, ज्या मातांनी आपल्या मुलांना कबाड कष्ट करून लहानाचे मोठे करण्यासाठी आयुष्य वेचलं, 
आई आपल्या मुलासाठी आयुष्यभर जे काही करते, ते ऋण मुले इच्छा असूनही फेडू शकत नाहीत.  
मुलाच्या जन्मानंतर, आईला माहित नसते की ती किती रात्री आपल्यासाठी आपल्या आईने जागून काढल्या , मुलांमध्ये मूल्यांचा आयुष्याचा पाया घालते.  मुलांना नीट वाचता यावे, काहीतरी बनता यावे यासाठी ते जिवाचे रान करते त्यांच्या प्रत्येक गरजेची काळजी घेते.  चांगल्या आरोग्याची आणि आवडीची काळजी घेऊन ती आपल्या मुलांसाठी  सर्व पदार्थ तयार करते. लहानाचा मोठा करून जगात सक्षम पणे उभारण्याची ताकत देते  आपल्याला कळत नाही, ती गोष्ट आईला न सांगता कळते. 
 आईचं निस्वार्थ प्रेम आणि तिचं प्रेम इतकं अमर्याद आहे की ते काही शब्दात मांडता येत नाही.  अशा आईच्या अगणित त्याग आणि प्रेमाचा सन्मान करण्यासाठी दरवर्षी मे महिन्याच्या दुसऱ्या रविवारी मातृदिन साजरा केला जातो.  यंदा मातृदिन ८ मे रोजी मंगरूळनाथ जे सीआय यांच्यावतीने काही कुटुंबातील मातांना भेटून त्यांचा सन्मान करण्यात आला. अशा आईबद्दल  प्रेम दाखवायचे , तर मदर्स डेच्या दिवशी आईसाठी असे काहीतरी करा, जे तिच्या हृदयाला स्पर्श करेल.
जिंदगी‬ की पहली टीचर‬ ‎मां‬
जिंदगी की पहली दोस्त‬ मां,
जिंदगी‬ भी मां ‎क्योंकि‬‎
जिंदगी देने वाली भी मां।

असे म्हणतात की जगातील सर्वात सुंदर आणि प्रेमळ नाते हे आई आणि मुलाचे असते.  आई आणि मुलाचे नाते अतूट असते आई मुलावर बिनशर्त  प्रेम करते.  कुठलाही स्वार्थ न ठेवता ती आपल्याला नऊ महिने तिच्या पोटी ठेवते.  यानंतर, जेव्हा आपण या जगात येतो तेव्हा ती आपल्याला खूप प्रेम आणि आपुलकी देते.  ती मुलांचे पालनपोषण करते आणि त्यांना सक्षम बनवते जेणेकरून ते या जगात जगू शकतील.
 आई शेवटच्या क्षणीही आपल्या मुलांची काळजी घेत असते.  आईच्या त्याग आणि बलिदानाचे स्मरण आणि सन्मान करण्यासाठी मातृदिन साजरा केला जातो.  या दिवशी प्रत्येकजण आपल्या आईचा आदर करणे काळाची गरज आहे आणि आई प्रति आपले प्रेम व्यक्त करण्यासाठी हा दिवस खास आहे.






मातृदिनानिमित्त ज्या महिलांनी आपल्या मुलांना बिकट परिस्थितीतून , सक्षम बनवले व मोठ्या हुद्द्यावर आहे. अशा मांतांचा आदरपूर्वक सन्मान. नंदाताई आसावा, लक्ष्मीताई निकम  , गीताताई शर्मा , रेखाताई रोकडे , चंदाताई मूंदडा,सुधाताई डहाके  यांना  सन्मानपत्र गुलाबाचे फुल व मिठाई देऊन त्यांचा सत्कार  करण्यात आला. या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून 
जे सी  मंगरूळनाथ अध्यक्ष शिल्पा चांडक
सौ शारदाताई बियाणी, सौ वीणाताई चितलांगे ,सौ चंदाताई गिरडेकर, ज्योती पाकधने, सौ दीपाताई अवगन,सौ किरण बजाज, देवकाताई देवडे, लक्ष्मीताई बुरे
या कार्यक्रमासाठी मोलाचे परिश्रम
जे सी  मंगरूळनाथ 
 डॉ.सुनीता गट्टाणी , सुचिता बाहेती , श्वेता बजाज ,उज्वला चौधरी पुजा लोहिया आणि जे .सी.आय निरज बजाज सचिन बंग, सुधाकर  चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

Post a Comment

0 Comments