मंगरूळपीर-स्थानिक यशवंतराव चव्हाण कला व विज्ञान महाविद्यालय मंगरूळपीर गृह अर्थशास्त्र अभ्यास मंडळा अंतर्गत अभ्यासक्रमावर आधारित विविध विषयांवर सेमिनार पी.पी.टी. द्वारे घेण्यात आले ,तसेच आज दिनांक 10 मे 2022 मंगळवार रोजी आभासी पद्धतीने कला व विज्ञान महाविद्यालय मंगरूळपीर आणि S.S.S.K.R. इनानी महाविद्यालय कारंजा लाड यांच्या संयुक्त विद्यमाने अतिथी व्याख्यान
चे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. कान्हेरकर सर, प्रमुख मार्गदर्शक प्रा. लुंबिनी गणविर मॅडम, प्रमुख उपस्थिती प्राचार्य डॉ. हळवे सर, सहसमन्वयक प्रा. स्मिता वंजाळकर मॅडम, तसेच IQ AC समन्वयक प्रोफेसर डॉ. शिंदे सर, प्रा .जाधव सर उपस्थित होते. सर्व मान्यवरांचे शब्द सुमनाने स्वागत करण्यात आले.
गृह अर्थशास्त्र अभ्यास मंडळाअंतर्गत आभासी पद्धतीने घेण्यात आलेल्या अतिथी व्याख्यानाच्या प्रास्ताविकामध्ये गृह अर्थशास्त्र विभाग प्रमुख एस. एस. जाजू यांनी अभ्यास मंडळाअंतर्गत घेण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली, तसेच प्रमुख मार्गदर्शक यांचे परिचय करून दिले व कार्यक्रमाची रूपरेषा मांडली. िद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास व नवीन तंत्रज्ञानाविषयी जागृती निर्माण करण्याकरिता असे उपक्रम महाविद्यालयांमध्ये दरवर्षी राबविले जातात असे प्रतिपादन केले.
यावेळी आपल्या प्रमुख अतिथी मार्गदर्शना मध्ये डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी कला महाविद्यालय , शेंदुर्जना घाट येथील गृहअर्थशास्त्र विभाग प्रमुख प्रा. लुंबिनी गणवीर मॅडम यांनी व्यक्तिमत्त्व विकास
या विषयावर अभ्यासपूर्वक सविस्तर व्याख्यान दिले ते म्हणाले की बहुतेक वेळा ज्या विशेषता मुळे आपले नुकसान होते त्यांच्याप्रती आपण जागृत असतो संवेदनशील असतो. प्रत्येक व्यक्ती भिन्न आहे फक्त गरज आहे ती आपली अंतर्गत क्षमता जागवण्याची. त्यांनी अनेक उदाहरणे देऊन फारच उत्तम असे व्याख्यान दिले. त्यानंतर IQAC समन्वयक प्रोफेसर डॉक्टर शिंदे सर आणि प्रा. जाधव सर यांनी मोलाचे मार्गदर्शन केले तसेच प्राचार्य डॉ. हळवे सर्वांनी कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या व कार्यक्रमाचे कौतुक केले तसेच अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. कान्हेरकर सर यांनी असे प्रतिपादन केले की व्यक्तीच्या व्यक्तिमत्वावर आधुनिक युगातील प्रसारमाध्यमे खूप मोठ्या प्रमाणात व वेगाने परिणाम करीत आहे त्याकडे आपल्याला लक्ष द्यावे लागेल तसेच कार्यक्रमाचे कौतुक केले. या आभासी व्याख्याना मध्ये एकूण 50 विद्यार्थी सहभागी झालेत. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रा. स्मिता वंजाळकर मॅडम यांनी मानले ,तर कार्यक्रमाचे उत्कृष्ट संचालन प्रा . दिव्या गावंडे मॅडम यांनी केले व हा कार्यक्रम संस्थेचे सचिव चंद्रकांत दादा ठाकरे यांच्या प्रेरणेने प्रेरित होऊन प्राचार्य डॉ. कान्हेरकर सर ,प्राचार्य डॉ. हळबे यांच्या मार्गदर्शनात प्रा. एस .एस. जाजू तसेच प्रा. स्मिता वजाळकर मॅडम यांनी आयोजित केले व कार्यक्रम यशस्वी संपन्न झाले.
0 Comments