Ticker

6/recent/ticker-posts

मंगरूळपीर गटविकास अधिकाऱ्यांना शिवीगाळ व मारहाण करून शासकीय कामात अडथळा

मंगरूळपीर येथील घटना: आरोपीवर गुन्हा दाखल शासकीय कामात अडथळा जीवे मारण्याची धमकी 
पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांना शिवीगाळ व मारहाण करून शासकीय कामात अडथळा केल्याप्रकरणी पोलिसांनी एका जणाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी सुरेश कांबळे गटविकास अधिकारी पंचायत समिती मंगरूळपीर यांनी तक्रार दिली की, फिर्यादी वाशिम जि.प.च्या ग्रामपंचायत विभागात नियमित सहायक गटविकास अधिकारी म्हणून कार्यरत असून, १७ नोव्हेंबर २०२१ पासून पंचायत समिती मंगरूळपीर येथे प्रभारी गटविकास अधिकारी म्हणून त्यांना प्रभार देण्यात आला आहे. ते मंगळवारी १० मे रोजी
दुपारी ३.३० वाजता मंगरूळपीर पंचायत समितीमधील त्यांच्या कक्षात काम करीत असताना अचानक एक व्यक्ती तेथे आली व तुम्ही काय करीत आहात, असे विचारले. त्यावर आपण कार्यालयीन काम करीत असल्याचे फिर्यादीने सांगितले असता तुम्ही खूप काम करता असे म्हणत त्याने पैशाची मागणी केली व टेबलवरील फाईल फाडत सभापतींना इकडे बोलवा असे म्हटले. त्यावर सभापतींना आपण बोलावू शकत नसल्याचे फिर्यादीने म्हटल्यानंतर ती व्यक्ती फिर्यादीला घेऊन सभापतींच्या कक्षात गेली. तेवढ्यात तालुका शिवसेना प्रमुख रामदास सुर्वे तेथे आले. त्यानंतर त्या व्यक्तीने सभापतींसमोर फिर्यादीला
अश्लील शिवीगाळ करून मारहाण करीत जिवे मारण्याची धमकी दिली. त्यावेळी तेथे सभापती हरीश महाकाळ, पंचायत समिती सदस्य अतुल गायकवाड, गणेश पवार, तसेच पंचायत समिती कार्यालयातील संजय राऊत, बबन आरू, रोशन गायकवाड आदी हजर होते.
सभापती हरीश महाकाळ यांनी त्या व्यक्तीला पकड़त सचिन तू शिवीगाळ तू करू नकोस, असे म्हटले. ती व्यक्ती सचिन डोफेकर असून, शेलूबाजार येथे राहत असल्याचे फिर्यादीला कळले, अशा तक्रारीवरून पोलिसांनी सचिन डोफेकर विद्ध कलम ३५३, ३३२, ५०४, ५०६ भादंविनुसार गुन्हा दाखल केला पुढील तपास मंगरूळपीर पोलिस करत आहे.

Post a Comment

0 Comments