वाशिम (दि. २८ जून) : आज अमरावती विभागीय शिक्षक आमदार एड . किरणराव सरनाईक यांची त्यांचे कार्यालयात जाऊन विदर्भ लोककलावंत संघटना कारंजा आणि वारकरी संप्रदाय यांनी सदिच्छा भेट घेतली . यावेळी सर्वप्रथम जिल्हाध्यक्ष संजय कडोळे, प्रदिप वानखडे यांनी अमरावती शिक्षक विधानपरिषद मतदार संघाचे लोकप्रिय आमदार एड किरणराव सरनाईक यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला .याप्रसंगी जिल्हाध्यक्ष संजय कडोळे, समाजसेवक प्रदिप वानखडे, लोककलावंत हभप लोमेश पाटील चौधरी यांनी कलावंताच्या विविध समस्या बाबत एड किरणराव सरनाईक यांना माहिती दिली व विधान परिषदेत प्रस्ताव घेऊन, सांस्कृतिक मंत्री ना. अमित देशमुख यांचे कडून कलावंताच्या समस्या सोडविण्याचा आग्रह धरला .
0 Comments