Ticker

6/recent/ticker-posts

ध्येयवेड्या संजय कडोळेंचे समाजकार्य प्रशंसनी

    

वाशिम : वाशिम जिल्ह्याचे मराठा सेवा संघ प्रणित संत नामदेव तुकाराम वारकरी परिषद वाशिम तर्फ जिल्हाध्यक्ष हभप श्रीकृष्ण पाटील राऊत महाराज यांनी सपत्निक, जिल्ह्यातील सुप्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते तथा गोंधळी लोककलावंत हभप संजय कडोळे यांचा राजनी चौक येथे, शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला . ज्येष्ठ लोककलावंत तथा वारकरी हभप लोमेश पाटील चौधरी आणि प्रदिपजी वानखडे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती . ह्याप्रसंगी सर्वप्रथम संजय कडोळे यांने श्री विठु रखुमाईचे पूजन केले . वारकरी संप्रदायाची कारंजा तालुक्याची जबाबदारी हभप संजय कडोळे यांचेकडे देण्याचे ठरविण्यात आले असून ऑगष्ट २०२२ मध्ये कारंजा येथे भव्य वारकरी मेळावा घेण्याचे ठरले . याप्रसंगी आपल्या अध्यक्षीय भाषणातून बोलतांना हभप श्रीकृष्ण पाटील राऊत महाराज म्हणाले की, "परिस्थितीने रंजले गांजलेले असतांनाही संजय कडोळे हे स्वतः बेघर असूनही सतत समाजासाठी कार्यरत असतात . आपल्या गोंधळी ह्या समाज प्रबोधनाच्या पारंपारिक लोककलेतून ते व्यसनमुक्तीचे कार्य करीत असतात तसेच गोंधळ जागरणातून मिळणारे उत्पन्न स्वतः करीता खर्ची न करता रंजल्या गांजल्याना श्रीक्षेत्र पंढरपूर वारी करता यावी व गरजूंना मदत करण्यासाठी वापरतात . खरोखरीच ध्येयवेड्या संजय कडोळे यांचे कार्य प्रशंसनिय आहे . त्यामुळे या 'सुदामाचा' मला सार्थ स्वाभिमान आहे."

Post a Comment

0 Comments