Ticker

6/recent/ticker-posts

मा. अपर पोलीस अधिक्षक, वाशिम यांचे विशेष पथकाकडून अवैध धंद्यावर धडक कार्यावाही

वाशिम जिल्ह्यातील अवध धंदे करणाऱ्यांवर कार्यवाही करुन जिल्ह्यात शांतता आणि कायदा व सुव्यवस्था अबाधीत रहावी याकरिता मा.पोलीस अधिक्षक श्री. बच्चन सिंह यांच्याकडून आपले अधिनस्त सर्वच पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी, स्थानिक गुन्हे शाखा तसेच तिन्ही उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी यांना वारंवार लेखी तोंडी तसेच बठकांचे आयोजन करून नियमित आदेश करुन सुचना व मार्गदर्शन केल्या जात आहे. त्याच प्रमाणे वेळोवेळी विशेष पथका मार्फत अवैध धंद्यांवर कारवाई करून अवैध धंदे करणारे इसमांबार कडक कायदेशी कार्यवाही करण्यात येत आहे.
दि. २८.०५.२०२२ रोजी मा. अपर पोलीस अधिक्षक, श्री. गोरख भामरे यांचे विशेष पथकाचे प्रभारी अधिकारी सहा पोलीस निरीक्षक श्री. भारत लसंते यांना गुप्त बातमीदाराकडून माहीती मिळाली की, वाशिम शहरातील काही भागात अवधरित्या वरली जुगार व दारुविक्री होत आहे. याबाबत सपोनि.लसंते यांनी मा. पोलीस अधिक्षक यांना माहीती देऊन त्यांचे आदेश व मार्गदर्शनात आपले पथका मार्फत वाशिम शहरातील पोष्ट ऑफिसचे समोरिल वाशिम हिंगोली हायवे रोडचे लगत, हिंगोली नाका येथे कृषी उत्पन्न बाजार समिती समोरिल रोडलगत व पाटणी चौक येथील भाजी मार्केट जवळ धाडी टाकून वरली जुगार खेळणारे व खेळविणारे ५ इसमांवार व धंदा मालक २ असे एकून ७ इसमांवर वरली जुगार कायद्यान्वये कार्यवाही करुन त्यांचेकडून वरली जुगार साहीत्य, नगदी रुपये, मोबाईल, मोटार सायकल असा एकून ९,९९,५७०/- रुपयाचा माल हस्तगत केला आहे. त्याच प्रमाणे लक्झरी बस स्टॅन्ड भागात व हिंगोली नाका भागात अवधरित्या दारु विक्री करणारे २ इसमांवर दारुबंदी कायद्यान्वये कार्यवाही करुन त्यांचेकडून दारु साठा, नगदी व मोटार सायकल असता एकून ७६,१००/- रुपयाचा माल हस्तगत केला आहे. अशा एकून वरली जुगार व अवैध दारु ब्रिकी करणारे एकून ९ इसमांवर वेगवेगळे ५ गुन्हे दाखल करून कार्यवाहीतून एकून २,७५,६७०/- रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

सदर कार्यावाहीत मा. पोलीस अधिक्षक यांचे मार्गदर्शनात मा. अपर पोलीस अधिक्षक यांचे विशेष पथक इन्चार्ज सहा पोलीस निरीक्षक भारत लसंते व त्यांचे सोबतचे पो.स्टाप पोहेकॉ/ ९६८ राजेश निर्वाण, नापोकों/३६९ कैलास नागरे, पोकों /१२६६ राजकुमार यादव, पोकों/ १२१८ दिपक गिरी, पोकों/३८३ दिपक मुळे यांनी कामगिरी बजावली आहे.

Post a Comment

0 Comments