मा. पोलीस अधिक्षक श्री बच्चन सिंह यांनी वाशिम जिल्हाचा पदभार स्विकारल्यापासून अनेक उपक्रम हाती घेतलेले आहेत महिला व मुलाच्या सुरक्षिततेसाठी निर्भया पथक याची स्थापना करून गरजुना विहित वेळेत मदत उपलब्ध करून दिली तसेच महीला मुली यांचे करीता विविध उपक्रम हाती घेतले असुन वाशिम जिल्हयात अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंधक कक्ष कार्यान्वित करण्यात आला आहे. वाशिम जिल्हयातील पोलीस स्टेशन मध्ये पळवून नेलेल्या मुलींचे गुन्हे गुन्हयातील आरोपी तसेच
पिडीतांचे शोध न लागल्याने प्रलंबीत आहेत. सदर गुन्हयातील मुलांचे शोध घेणे करीता सदरचे प्रकरण अनैतीक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष, वाशिम यांचे कडे वर्ग करण्यात आलेले आहे. त्यापैकीच १ पोलीस स्टेशन वाशिम शहर येथील अपराध कमांक ५०२/२०१८ कलम ३६० भादवि प्रमाणे दाखल गुन्हयातील फिर्यादी गौतम गुलाब पैठणे रा अकोला याची अपहृत मुलगी हिला आरोपी नाम शुभम अनिल गायकवाड स. अकोट फैल अकोला याने मागील ४ वर्षा पूर्वी फुस लावून पळवून नेले होते. सदर पिडीता हिचे शोधा बाबत सर्वोत्तरी प्रयत्न करुण मिळालेल्या माहीती वरूण पिड़ोता हिचा शोध घेतला असता सदर पिडीता हो अकोट फैल अकोला येथे मिळून आली आहे. तसेच गुन्हयातील आरोपी शुभम अनिल गायकवाड याचा शोध घेतला असता तो सुध्दा मिळून आल्याने त्यास अकोट फैल अकोला येथून ताब्यात घेण्यात आले आहे. तसेच २ पोलीस स्टेशन मानोरा अपराभ क्रमांक १६२/२०१९ कलम ३६३ भादवि गुन्हयातील फिर्यादी यादव महादा खंडारे रा शेंदोणा याची नात अपहृत मूलगी हिला आरोपी विक्की विठठल हमारे रा. शेंदोणा याने मागील ३ वर्षा पर्वो फूस लावून पळवून नेले होते. सदर पिडीता हिचा शोध घेतला असता ती जाधववाडी, ता. इंदापूर, जि. पुणे येथे मिळून आल्याने तिला ताब्यात घेण्यात आले आहे. तसेच गुन्हयातील आरोपी हा रेडी शेतशिवारात ता. इंदापूर, जि. पुणे येथे मिळून आल्याने त्यास ताब्यात घेण्यात आले आहे. तसेच पोलीस स्टेशन मालेगांव अपराध कमांक ८३ / २०२० कलम ३६३ भादवि मधील फिर्यादी सौ. राधाबाई गुणाजी गाढवे रा.वारंगी यांची अपहृत मूलगी हिला आरोपी शुभम नारायण सरकटे रा वारंगी याने फूस लावन पळवून नेले होते. सदर गुन्हयातील पिडीता ही माताळवाडी, भूगाव, जि. पुणे येथे असल्याचे मिळालेल्या गुप्त बातमीवरूण समजल्याने नमूद पिडीता हिचा सदर परीसरात शोध घेतला असता तो मिळून आल्याने तिला ताब्यात घेण्यात आले आहे. तसेच गुन्हयातील आरोपी विक्की विठठल सरकटे याचा सुध्दा शोध घेण्यात आला आहे. अशा प्रकारे अनैतीक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष वाशिम पथकास बरेच कालावधी पासून मिळून न आलेल्या अपत बालीका यांचा शोध घेण्यात यश मिळाले आहे. तसेच इतरही गुन्हयातील अदयापही मिळून न आलेल्या अपहृत
बालीका यांचा शोध घेण्याकरीता सर्वोत्तरी प्रयत्न करण्यात येत आहेत. सदरची कार्यवाही मा. पोलीस अधिक्षक श्री बच्चनसिंह, अप्पर पोलीस अधिक्षक गोरख भामरे यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक सोमनाथ जाधव, मपोउपनि एस. एम. इथापे पोहेकॉ/ संदीप निखाडे चालक पाहेकों/ किशोर जाधव, पोकों / जगदीश वाघमारे, सपोहेकां / पुष्पा राउत, मपोकॉ/ हर्षल गायकवाड, मपीकों / उज्वला गायकवाड तसेच सायबर सेल येथील पोका/ महेश वानखेड पोकॉ/ गोपाल चौधरी यांनी सहभाग नोंदविला आहे.
0 Comments