Ticker

6/recent/ticker-posts

मुदत संपणाऱ्या 292 ग्रामपंचायतींचीआरक्षण सोडत 6 जून रोजी



         वाशिम, दि. 31  : माहे जानेवारी 2021 ते डिसेंबर 2022 या कालावधीत जिल्हयातील वाशिम-53, मालेगांव-48, रिसोड-45, कारंजा-61, मंगरुळपीर-44 आणि मानोरा-41 अशा एकूण 292 ग्रामपंचायतींची मुदत संपत आहे. जानेवारी 2021 ते डिसेंबर 2022 या कालावधीत मुदत संपणाऱ्या या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी आरक्षण सोडत कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाच्या 30 मे रोजीच्या पत्रान्वये प्रसिध्द करण्यात आला आहे. या कार्यक्रमानूसार 6 जून रोजी विशेष ग्रामसभेमध्ये प्रभाग रचनेवर आरक्षणाची सोडत काढण्यात येणार आहे.

*******


Post a Comment

0 Comments