ज्या महामानवांच्या विचारधारे विचारांनी आपण प्रभावित होऊन आज आपण सन्मानाने जगत आहोत, महामानव रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज, राज्यघटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर महिलांसाठी शिक्षणाचे दार उघडे करून देणारे महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपति शाहू महाराज, जिजामाता ,सावित्रीबाई फुले, अहिल्याबाई होळकर इत्यादी सर्व महामानव, व महामातांना त्रिवार अभिवादन तसेच मंचकाकावरील उपस्थित
अनिस च्या अध्यक्षा सरोज ताई पाटील विश्वस्त शैलाताई दाभोळकर, मुक्ता दाभोळकर, अभिनेते किरण माने,
महाराष्ट्र महीला विकास मंच, विधवा महिला सन्मान कायदा अभियान या संघटनेच्या वतीने हेरवाड ग्रामपंचायत चे सरपंच सुरगोंडा पाटील आणि ग्रामपंचायत सदस्य, ज्यांनी विधवा प्रथा बंद करण्याचा ठराव मांडला आणि तो स्वतः गावात आंमलात आणला ते प्रमोद झिंजाडे बाबा यांचा आपल्या संघटनेच्या राज्य महासचिव रेवती ताई आढाव, नवी मुंबई च्या वरिष्ठ उपाध्यक्षा नंदाताई डेरे, आणि चित्राताई गायकवाड यांनी हेरवाड येथे जाऊन सत्कार केला.
महाराष्ट्र महिला विकास मंच शाखा नवी मुंबई तुम्हा सर्वांचेच खुप खुप अभिनंदन व पुढील कार्यास शुभेच्छा .
महाराष्ट्र महिला विकास मंच च्या विधवा महिला समान कायदा अभियान राबविण्यासाठी महाराष्ट्र राज्याच्या समन्वयक कालिंदिलाई पाटील यांनी कोणत्याही परिणामाची तमा न बाळगता हिरीरीने अभियानात सहभाग घेतला आणि अभियानाला सुरुवात केली या अभियानाच्या महायज्ञात बऱ्याच ग्रामपंचायतीने विधवा महिला समान कायदा राबवण्यासाठी ठराव घेण्यातआले. कालींदिताई ठुबे पाटील यांचे संपूर्ण महाराष्ट्र आणि विदर्भ स्वागत करत आहे. विदर्भातील आणि महाराष्ट्रातील संपूर्ण ग्रामपंचायत मधून विधवा महिला सन्मान कायद्यासाठी आपण सर्वांनी पुढाकार घ्यावा असे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन व सत्कार सोहळा हेरवाड च्या कार्यक्रमात मान्यवरांनी आपले मत व्यक्त केले.
अनेक ठिकाणच्या मान्यवरांचा सत्कार सुद्धा करण्यात आला या कार्यक्रमासाठी पंचक्रोशीतील मान्यवरांची उपस्थिती होती
0 Comments