• पोलीस स्टेशन वाशिम ग्रामिण हददीतील ग्राम नाटाणा येथे वेगवेगळया ठिकाणा वरुन अज्ञात आरोपीतांनी चोरी करुन एकुण 101000/- रुपयांचा माल चोरून नेल्या प्रकरणी पोलीस स्टेशन वाशिम ग्रामिण येथे फिर्यादी यांचे प्राप्त तक्रारी नुसार 1 अप क्र. 238/22 क. 461380 भादंवी, 2 240/22 क. 379 34 भादंवी 3 241 22 क. 379 भादंवी अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले होते. फिर्यादी यांनी दिलेल्या फिर्याद प्रमाणे गुन्हे दाखल होताच पोलीस स्टेशन वाशिम ग्रामिण चे ठाणेदार महक स्वामी Prob.IPS यांनी वेळीच दखल घेवून गोपनिय बातमीदार नेण्यात आले. गोपनिय बातमीदाराचे प्राप्त माहीती नुसार पोलीस पथक आरोपी शोध कामी रवाना करण्यात आले. पोलीस पथकाने नमुद गुन्हयातील आरोपीचा अत्यंत शिताफीने शोध घेवून उमेश सुरेश उचित वय24 वर्ष रा. नागठाणा यास ताब्यात घेण्यात आले. त्याने गुन्हयाची कबुली दिल्याने गुन्हयात अटक करण्यात आली. त्याचे कडुन पोलीस स्टेशन वाशिम ग्रामिण हददीतील ग्राम नागठाणा येथील दाखल वेगवेगळया 5 गुन्हे उघडकीस आणुन नमुद गुन्हयात चोरी गेलेला संपुर्ण मुद्देमाल 1 ) कामेट कंपनीचे इंजीन किं अंदाज 15000/- 2) 12 स्प्रिकंलर तोटया कि अंदाजे - 12000/- 3 ) एक सोनी कंपनीचा एलईडी टिव्ही- 40000/- 4 ) एक वरपुल कंपनीचा फ्रिज किं अं 15000/- 5 ) एक स्पर्म वार्मर मशीन कि अं. 4000/- 5) लक्ष्मी कंपनीची मोटार 3 एचपी कि अं 15000/- रु असा एकुण किं. 101000/- रु चा जप्त करण्यात आला. अटक करण्यात आलेला आरोपी नामे उमेश सुरेश उचित वय24 वर्ष रा. नागटाणा याचे साथीदार नामे संदीप यशवंता धाबे वय 36 वर्ष व किसन विठठलराव भालेराव वय 28 वर्ष दोन्ही रा. नागठाणा यांची नांवे निष्पन्न करुन त्यांचा तपास पथकाच मार्फतीने शोध घेण्यात आला. त्यांना ताब्यात घेवून अटक करण्यात आली आहे. तसेच अटक करण्यात आलेल्या आरोपीतांवर वाशिम जिल्हयात किंवा इतर जिल्हयात दाखल आहेत का याची खात्री करुन पुढील तपास करण्यात येत आहे.
सदर ची कार्यवाही मा. श्री. बच्चन सिंह साहेब, पोलीस अधिक्षक वाशिम मा. श्री गोरख भामरे साहेब अपर पोलीस अधिक्षक वाशिम व मा. श्री. सुनिलकुमार पुजारी उप. वि. पोलीस अधिकारी वाशिम यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन वाशिम ग्रामिण चे ठाणेदार महक स्वामी Prob. IPS व तपास पथक Asi नंदकुमार सरनाईक, पोहेकॉ संदीप गायकवाड नापोकॉ आशिष पाटक, पोकों उमेश देशमुख, पोकॉ कैलास बळी, पोकों विनोद मस्के यांनी केली आहे.
0 Comments