मंगरूळपीर. दि.,७ जून रोजी सांस्कृतिक भवन येथे खरीप पुर्व कृषी हंगाम नियोजना संदर्भात मार्गदर्शन व सेवा सहकारी सोसायटीचे नवनिर्वाचित संचालकांचा सत्कार समारंभ , दि. अकोला व वाशिम जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखा-मंगरूळपीर च्या सहकार्याने खरीप पुर्व कृषी हंगाम नियोजना संदर्भात शेतकरी मार्गदर्शन तसेच सेवा सहकारी सोसायटीचे नवनिर्वाचित सन्माननीय संचालकांचा सत्कार करण्यात आला .
तसेच. शेतकरी हवामान तज्ञ श्री पंजाबराव डख यांच्या कार्यक्रमाचे लाईव्ह प्रसारण करण्यात आले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.. सुभाषराव ठाकरे साहेब माजी राज्यमंत्री म.रा. तथा संचालक दि. अकोला व वाशिम जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकअकोला व प्रमुख- मार्गदर्शक मा.चंद्रकांत दादा ठाकरे अध्यक्ष, जि.प. वाशिम-तसेच कृषी तज्ञ श्री. पी. एस. शेळके सेवा निवृत्त कृषी अधिकारी डॉ. बि. डी. गिते प्रभारी अधिकारी, कृषी संशोधन केंद्र वाशिम प्रमुख उपस्थित बारड साहेब, सभापती हरीश महाकाळ , खरेदी विक्री संघ सदाशिव जाधव,भास्कर पाटील,चंद्रकांत पाकधने ,राम पाटील , सचिन राऊत, पांडुरंग कोठाळे ,यशवंत जाधव, ठाले साहेब, प्रशांत उकंडे, तायडे साहेब आत्माराम पाटील आनंद राऊत, रामेश्वर ठाकरे, शामराव व्यवहारे, इत्यादी सह मोठ्या प्रमाणात पदाधिकारी उपस्थित होते.
देवानंद सुर्व्ये,
डी एन लुंगे,दिलीप पाटील,सूरज खाडे,सह जिल्हा मध्यवर्ती बँकेचे कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले.
या वेळी . खरीप हंगामातील पिकाविषयी शेतकऱ्यांना मार्गदर्शन व्हावं या उद्देशाने जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखा मंगरूळपीर च्या वतीनं कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.
यावेळी माजी राज्यमंत्री सुभाषराव ठाकरे यांनी अध्यक्षीय भाषणात असे उद्गार काढले सन 1982 च्या दरम्यान शेतकऱ्यांचे कैवारी माननीय शरदचंद्र पवार साहेब यांनी खरेदी विक्री संघ मंगरूळपीर येथे टीकास मारून भूमिपूजन केले होते साहेबांनी तेव्हा सांगितले होते की या माध्यमातून खूप मोठी प्रगती होणार . त्या लावलेल्या रोपट्याचे रूपांतर वटवृक्षात होऊन संपूर्ण विदर्भात जाळे पसरले आहे असे उद्गार यावेळी काढले.
यावेळी शेती पुरक व्यवसाय व शेतकऱ्यांचे हक्क या बाबत आपल्या अध्यक्षस्थानी संभाषणात त्यांनी आपले निवडणुकीतील अणुभव कथन केले,म्हणाले या जिल्ह्यात व तालुक्यात शेती व्यवसायात अनेक हिरे आहेत ज्यांची प्रेरणा प्रत्येकाने घ्यायला हवी,बँक ही शेतकऱ्यांच्या पाठीशी वाटेल तेंव्हा तिचा ऊपभोग घ्यावा मात्र स्वतःची समजुन,कारण कोरपे परिवाराने सोसायटी व सहकार क्षेत्रातील व्यक्तीला हक्काचे कार्यालय व्हावे व ती पावले ऊचलीत, तर ठाकरे हे राजकारणात भारीच असा मिश्कील टोला सुद्धा यावेळी विरोधकाला लगावला,स्पर्धेच युग आहे निवडणूक सोपी राहली नाही,सेवा सोसायटी ची फारच वेगळी म्हणुन त्यांचा माणसन्मान व दर्जा ऊंचावण्या करीता त्यांचा सत्कार हा माझी महत्वकांक्षा पण ती राक्षसी नाही व तुम्ही राक्षसी ठेऊ नका,तरूणांना अनुभव होईल त्यांना या प्रवर्गात समाविष्ट करून घ्या जुन्या लोकांनी नवीन तरूणांना संधी द्यावी,अशावेळी आपण सोबत घेऊन चालत असतांना एकत्र काम करावे "अख्खी कोंबडी खाऊ नका" टप्याटप्याने विकास साधा,८ अ . असलेल्या सेवा सोसायटीला मागेल तेथे ईमारत देण्यासाठी कटीबद्ध राहु ,योजना बंद झाली नाही ,महीलांना कार्यभार समजु द्या तीच्या न्यायदानात निर्णयात ढवळाढवळ करू नका,कोरोना बाबतीत बोलतांना म्हणाले की माझ्यावर प्रेम करनारे खुप असल्याने कुणी तक्रारी करतील व कार्यक्रम रद्दबातल होईल पण तस नाही झाले पण तरीही आपण सर्वांनी काळजी घेने गरजेचे,असे परखडपणे आपल्या अध्यक्षीय भाषणात माजीमंत्री सुभाषराव ठाकरे बोलत होते,
त्याच हेतूने वाशिम अकोला जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या वतीने नवनिर्वाचित सहकार सोसायटीचे अध्यक्ष उपाध्यक्ष सदस्यांचा भव्य सत्कार म्हणजे आज , रोजी त्या वटवृक्षाचा सन्मान.
वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपीर तालुक्यातील 66 सहकारी सोसायटीच्या सदस्यांचा सत्कार करण्यात आला असून आज मोठ्या प्रमाणात जिल्हा मध्यवर्ती बँकेचे व्यवहार पारदर्शकता व शेतकऱ्या प्रती असलेली असतात आणि यामध्ये शेतकऱ्यांचे हित यावर बँका वेगवेगळ्या माध्यमातून कर्जपुरवठा करत आहेत व याहीपुढे निपक्ष पणे चांगली सेवा देतील. अशीही यावेळी सुभाषराव ठाकरे साहेब यांनी मत व्यक्त केले.
तसेच शेतकऱ्यांना मोलाचे मार्गदर्शन करण्यात आले.
तसेच शेतकऱ्यांना मोलाचे मार्गदर्शन पि एस शेळके यांनी केले शेतकऱ्यांनी कोणत्या जातीचे बियाणे कसे लावावे घरच्या बियाण्यात प्रक्रिया करूनच बी पेरावे कोणत्या वेळी योग्य खत कसे वापरावे एवढेच नव्हे तर अडचण आल्यास कधीही कॉल करा आपली समस्या निश्चितच आम्ही सोडवू असे त्यांनी वचन दिले व
पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला येथील शास्त्रज्ञ डॉ भरत गीते यांनी खरीप हंगामात सोयाबीन पिकाची शेतकऱ्यांनी कोणती काळजी घ्यावी यासंदर्भात मार्गदर्शन केले. या कार्यशाळेत मंगरूळपीर तालुक्यातील शेतकरी व सरपंच ,संचालक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
कोणत्याही प्रकारच्या मदतीची वाट न पाहता शेतकऱ्यांनी जोमाला कामाला लागावे कोरोना संपला नाही प्रशासनाने दिलेल्या आदेशाचे काटेकोरपणे पालन करावे पाऊस आल्यावर लगेच पेरणीला सुरुवात होणार आहे दुबार पेरणीचे संकट येऊ नये याची काळजी घ्यावी असे प्रतिपादन चंद्रकांत दादा ठाकरे यांनी केले.
तसेच संचालन प्रा. अरूण इगले , भावराव व्यवहारे यांनी केले.
कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन पांडुरंग कोठाळे यांनी केले
येणाऱ्या पाहुण्यांची व नागरिकांची रस पोळी जेवणाची व्यवस्था सुद्धा करण्यात आली होती हा उत्कृष्ट रीतीने कार्यक्रम संपन्न झाला


















0 Comments