Ticker

6/recent/ticker-posts

युवकांनो आदिवासी बापाच्या पायातील कुरपं आणी मायच्या हातचं खुरपं समजून प्रगती करा-सुभाष पवणे




 
कांतीसुर्य बिरसा मुंडा पुण्यतिथी निमीत्य विनम्र अभिवादन 

वाशिम:- सकाळी 10 वाजता मंगरूळपीर येथील नॅशनल हायवे 161E ला लागुन असलेल्या बिरसा मुंडा स्मारकाच्या ठिकाणी आदिवासी बांधवासह बामसेफने श्रद्धांजली वाहिली यावेळी मंगरुळपीरचे गटशिक्षणाधिकारी सुभाष पवणे आणी मुख्याध्यापक विष्णू अगुलदरे यांचे हस्ते पूजन व माल्यार्पण करण्यात आले . 
पाणी , जंगल आणि भूमीसाठीची लढाई शतके जुनी आहे. या लढाईत शेकडो नायक आले आणि गेले, परंतु हा लढा आजही कायम आहे. 
बिरसा मुंडा यांचा जन्म झारखंडमधील उलिहातू या गावी १५ नोव्हेंबर १८७५ रोजी झाला. त्यांचे शिक्षण जर्मन मिशननरी स्कूल मध्ये झाले. सगळ्यांमध्ये मिळून- मिसळून राहण्याचा बिरसाचा स्वभाव होता. त्यामुळे तरुण वयात त्यांनी समवयस्क आणि समविचारी सहकार्यांचे संघटन केले.
इंग्रजांनी त्याला अटक केली व तुरुंगात अतोनात छळ केला. ९ जून १९०० रोजी बिरसा मुंडा यांचा रांची कारागृहात मृत्यू झाला. बिरसा मुंडा यांना लोकांनी जननायक हा किताब बहाल केला.
मात्र, त्यांच्या निधनानंतर सरकारने रांची विमानतळ आणि तुरुंगाला त्यांचे नाव दिले. त्याचे एक चित्र भारतीय संसदेतही बसविण्यात आले आहे. बिहार, ओरिसा, झारखंड, छत्तीसगड, पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्र च्या आदिवासी भागात बिरसा मुंडाची देवाप्रमाणे पूजा केली जाते आणि त्यांच्या बलिदानाचे स्मरण केले जाते.





याप्रसंगी  सुखदेव ढंगारे ,जीवन हंगवणे , विष्णू अगुलदरे ,वसंतराव झोडपे सुखदेव घोरसडे,  कैलास ढगे गजानन ठोंबरे ,सुरेश भोंडने ,रमेश श्रीपत भोंडने  प्रकाश टाले, संजय बळी, सुरेश माडकर , संजय ढळे , प्रमोद निचळे,  साधना ताई  निचळ , ढळे ताई रमेश भोंडने , गजानन लडके   सुदाम भोडणे  विनोद चापे ,सोनू वाडेकर  अविनाश बलगव्हाणे , अशोक गेडाम ,दसरथ वाघमारे, नितिन साखरे, 
प्रा डॉ संजीव इंगळे रमेश भोंडणे (केंद्रप्रमुख) वाशिम खबर आवाज महाराष्ट्राचे  संपादक सुधाकरभाऊचौधरी,पत्रकार  विनोद डेरे, संजीव भगत युवराज जाधव  पत्रकार फुलचंद भगत , युवराज जाधव, अगलधरे, गीता ठोंबरे, मंगला ढगे ,ज्योती बळी, सुरेखा वाडेकर, ,गंगा घोरसडे ,पुष्पा पवणे ,सारिका पांडे, लक्ष्मी सातपुते,सौ.लडके ताई,
 तसेच आदीवासी महिला भगीनी यांनी श्रद्धांजली अर्पण करून अभिवादन केले.




संध्याकाळी आठ वाजता स्फृतीगीतांचा संगितमय कार्यक्रम आयोजीत करुन मान्यवरांनी क्रांतीसुर्य बिरसा मुंडा यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकत आदीवासी समाजाची आजची दशा आणी दिशा तसेच समाजऊध्दारासाठी कराव
याच्या ऊपाययोजना यावर आपले मत व्यक्त केले. या कार्यक्रमासाठी परिसरातील नागरिकांनी उपस्थिती दर्शविली होती







Post a Comment

0 Comments