वाशीम शहरामध्ये जगातिक बालकामगार विरोधी दिवसा निमित्य शहरातील सर्व हॉटेल चालक, गॅरेज चालक व सर्व अस्थापना धारक यांच्याकडून बालमजुरी निर्मूलन व पुनर्वसन राज्य कृती आराखड्याच्या अनुषंगाने व मा.जिल्हाधिकारी तसेच सरकारी कामगार अधिकारी यांच्या आदेशाने वाशीम शहरामध्ये व्यवसाय करणाऱ्या व्यवसायिका कडून स्वखुशीने व पूर्ण शुद्धीत ,जबाबदारीने माझ्या व्यवसायात कधीही बाल मजूर ठेवणार नाही व बालमजुरी करून घेणार नाही मी व माझे सहकारी शासनास आम्ही हमी देतो माझा व्यवसाय चालू असेपर्यंत मी 18 वर्षाखालील कोणतेही बाल कामगार कामावर ठेवणार नाही. जर यात माझ्या हातून कसूर झाल्यास त्यास सर्वस्वी जबाबदारी माझी राहील याची मला पूर्ण जाणीव आहे.
अशा आशयाचे हमीपत्र सर्व अस्थापणा धारकाकडून घेण्यात आले.या मोहिमेमध्ये सरकारी कामगार अधिकारी कार्यालयातील कर्मचारी योगेश गोटे, चाईल्ड लाईन १०९८ कार्यालयातील कर्मचारी शाहिद खान,श्रीमती अर्चना वानखेडे,अविनाश चौधरी, गोपीशंकर आरु,अविनाश सोनुने,श्रीमती शिवांगी गिरी,कु.निकिता ढोके उपस्थित होते.
आपणास बाल कामगार आढल्यास तसेच काळजी व संरक्षणाची गरज असणारे 0 ते 18 वर्षे वयोगटातील बालकांना मदत करण्याकरिता चाईल्ड लाईनच्या 1098 या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन सरकारी कामगार अधिकारी गौरवकुमार नालींदे यांनी केले
0 Comments