Ticker

6/recent/ticker-posts

प्रतिबंधित गुटखा साठवणूक व विक्री करणाऱ्यावर मानोरा पोलिसांची धाड : ०१.७६ लाखांचा मुद्देमाल जप्त.

'गुटखा तंबाखू पान मसाला'चे सेवन हे मानवी आरोग्यास अत्यंत धोकादायक असून त्याच्या सेवनाने विविध जीवघेणे आजार जडतात. म्हणूनच महाराष्ट्र शासनाने गुटखा तंबाखू पान मसाला' विक्री करणे किंवा साठवणूक करण्यावर प्रतिबंध घातला आहे. असे असले तरी काहीजण चोरूनलपून 'गुटखा तंबाखू पान मसाला' नामक विषाची विक्री करत असतात. त्यांच्यावर मा. पोलीस अधीक्षक श्री.बच्चन सिंह (IPS) यांच्या मार्गदर्शनाखाली व नैतृत्वाखाली कायद्याचा बडगा उगारत कारवाईचा सपाटा सुरु आहे.
पो.स्टे. मानोरा हद्दीतील ग्राम कुपटा येथे मोठ्या प्रमाणात गुटखा साठवणूक व विक्री होत असल्याच्या गुप्त माहितीवरून मानोरा पोलिसांनी सदर ठिकाणी धाड टाकली. ग्राम कुपटा येथील रहिवाशी •असलेला बाळू उर्फ सुनील नामदेवराव देशमुख हा अवैधपणे शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा ग्राम कुपटा • येथील किरण जाधव याचे घरातील भाड्याच्या खोलीत साठवून विक्री करत असल्याचे दिसून आले. • भाड्याच्या खोलीची पंचासमक्ष झडती घेतली व विमल केसरयुक्त पान मसाला, वाह, रोज, व्ही, आय, तंबाखू पिक आदी गुटखा अंदाजे किंमत ०१.७६ लाख रुपयांचा मुद्देमाल पंचासमक्ष जप्त केला. भाड्याच्या खोलीतील गुटख्यावर धाड पडल्याचे समजताच आरोपी हा गावातून फरार झाला. त्याचा शोध घेणे सुरु असून पो.स्टे. मानोरा येथे आरोपीविरुद्ध कलम ३२८ भादंवि प्रमाणे गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरु आहे.
सदर कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्री. बच्चन सिंह (IPS) यांचे मार्गदर्शनाखाली व पोलीस उपविभागीय अधिकारी कारंजा श्री जगदीश पांडे, प्रभारी ठाणेदार श्री. महेश कुचेकर यांचे नैतृत्वाखाली पोउपनि रामेश्वर नागरे, पोहेकॉ संदीप बरडे, नापोकॉ. मयुरेश तिवारी, नापोकॉ. बालाजी महल्ले, पोकॉ. शकील व चालक पोहेकॉ नरेंद्र खाडे यांनी सदरची कामगिरी पार पाडली.

Post a Comment

0 Comments