Ticker

6/recent/ticker-posts

जिल्हा न्यायालय येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा

  

वाशिम, : जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व जिल्हा विधिज्ञ संघ,वाशिमच्या वतीने 21 जून रोजी जिल्हा न्यायालयात  आंतरराष्ट्रीय योग दिवसाचे आयोजन करण्यात आले.अध्यक्षस्थानी जिल्हा व सत्र न्यायाधिश अमोघ कलोती  होते.योग प्रशिक्षक संतोष भारसाकळे यांनी प्रात्याक्षिकाव्दारे योगाचे महत्व  उपस्थितांना सांगून योगाचे प्रशिक्षण दिले.यावेळी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव,जिल्हा न्यायालयातील न्यायीक अधिकारी, विधिज्ञ मंडळी व कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार श्रीमती हर्षा बारड यांनी मानले. 


Post a Comment

0 Comments