Ticker

6/recent/ticker-posts

गोव्यातील पती निधनानंतर अशा कुप्रथा व हेळसांड बंद करणार , कालींदी पाटील

समाजातील महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी व अनिष्ठ रूढी परंपराच्या नावाखाली होणारी महीलांची कुचंबणा, अवहेलना थांबवण्यासाठी परीवर्तनवादी व्यक्ती संघटीत होणे गरजेचे आहे त्यासाठी महाराष्ट्र महीला विकास मंच च्या वतीने प्रतेक राज्याकडे वाटचाल.  या ग्रुपच्या माध्यमातुन एकत्रीत येत आहोत
पती निधनानंतर पत्नीचे
कुंकु पुसणे,बांगडया फोडणे, जोडवी काढणे या कुप्रथेविरूध्द आमच्य चळवळीला महाराष्ट्रात यश आले . शासनाने परिपत्रक ही काढले याच पद्धतीने आता गोवा राज्यात अशा प्रथाविरोधात चळवळ सुरू करत आहोत 
व त्याच विषयावर गोव्यातील पत्रकार, इलेक्ट्रॉनिक मिडीया सोबत झुम मिटींग घेण्यात आली तिथे ही भयानक रूढी परंपरा प्रथा आहेत ज्या ज्या राज्यात अशा कुप्रथा आहेत तिथे प्रतिबंध झालाच पाहीजे. या प्रथा म्हणजे माणुसकीला काळीमा फासणार्या व स्त्री स्वातंत्र्यावर गदा आणणार्या आहेत
आपल्या देशाच्या संविधानाने स्त्रीला गुलामीतुन मुक्त करून स्री आणि पुरूष समान नागरिकत्व दिलेले असतानाही स्री जातीवर असा अन्याय का केला जातो अन हे कीती काळ चालणार आहे ? याचा विचार करणार्याची संख्या अर्थाने गरज आहे .  आता याचा काळ संपवलेला आहे आता आम्ही हे बिल्कुल सहन करणार नाही प्रतेक राज्यातुन या विरोधात चळवळ ऊभी करणार आहोत याचाच एक भाग म्हणून आम्ही सध्या गोव्यामधे चळवळीस सुरूवात केलेली आहे. पुढच्याच आठवड्यात गोव्यातील मंत्रीमहोदय, पत्रकार, इलेक्ट्रॉनिक मिडीया, स्वंयसेवी संस्थाशी चर्चा, मंथन करून गोव्यातील अशा कुप्रथा व हेळसांड बंद करणारच आहोत महाराष्ट्र महिला विकास मंच जन जन आंदोलनाच्या प्रणेत्या कालींदी पाटील

Post a Comment

0 Comments