दि. १७.०६.२०२२ वाशिम पोलिसांची ९ कारवाई
मा.पालीस अधीक्षक श्री. बच्चन सिंह (IPS) हे गुन्हेगारांवर वचक ठेवण्यासाठी व गुन्हेगारी नियंत्रणात ठेवणेकरिता विविध उपक्रम राबवीत असून त्याचाच एक भाग म्हणून जिल्ह्यात अवध शस्त्रे बाळगणान्या लोकांविरोधात मोहीम हाती घेतली असून त्याबाबत सर्व पोलीस स्टेशन अधिकाऱ्यांना प्रभावीपण मोहीम राबविण्यास आदर्शित करण्यात आले आहे. त्या अनुषंगाने मा. पोलीस अधीक्षक श्री बच्चन सिंह (IPS) यांचे मार्गदर्शनात पोलीस
निरीक्षक श्री. एस. एम. जाधव, स्थानिक गुन्हे शाखा, वाशिम यांनी त्यांचे शाखेतून वेगवेगळे पथक तयार करून कारवाईकामी रवाना केले व वाशिम शहरातील पाटणी कमर्शियल कॉम्प्लेक्स येथील विष्णू प्रिंटर्स या दुकानातून एक लाखंडी धारदार तलवार जप्त करण्यात आली, त्या संबंधाने पोलीस स्टेशन शहर येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तसेच रिसोड तालुक्यातील ग्राम चिखली येथे एका व्यक्तीचे घरातून दोन लोखंडी तलवारी जप्त करण्यात आल्या असून त्यासंबंधान पोलीस स्टेशन रिसोड येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. यावर्षभरातील शस्त्र अधिनियमांन्वय करण्यात आलेली हि नववी (०९) कारवाई आहे.
सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्री. बच्चन सिंह (IPS), मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. गोरख भामरे यांचे नेतृत्वात श्री. एस. एम. जाधव. पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, वाशिम यांच्या पथकातील सपान प्रमोद इंगळे, सपानि, विजय जाधव, पोहचा सुनील पवार, गजानन अवगळे, पाना, राजेश गिरी, अमोल इंगाले, गजानन गोटे, राम नागलकर. पाका किशार खंडार, निलेश इंगळे, डिगांबर मार, अविनाश वाढ, संतोष शेनकुडे, मपोहचा. सुषमा तोड़कर, तेहमिना शेख यांनो कलला आहे.
वाशिम जिल्ह्यात अवत्र शस्त्रसाठा बाळगणा-या लोकांवर ततारतेने कारवाई सुरु असून मा. पोलीस अधीक्षक श्री. बच्चन सिंह(IPS) यांचे कुशल नेतृत्वाखाली संपूर्ण वाशिम जिल्हा पालीस दिल जनतेच्या सुरक्षसाठा कटिबद्ध आहे. नागरिकांनी अश्याप्रकारे विनापरवाना शस्त्र बाळगीत समाजामध्य दहशत निर्माण करू पाहणाऱ्या इसमांविरोधात न घाबरता समोर येऊन तक्रार करण्याचे आवाहन पोलीस दलातर्फे करण्यात येत आहे.
0 Comments