Ticker

6/recent/ticker-posts

मंगलमूर्ती हॉस्पिटलचे उद्घाटन,

प्रतिनिधी।कारंजा
स्थानीय स्व.प्रभुजी नानाजी गर्जे संकुल कारंजा येथे डॉक्टर कु श्रावणी सुधाकरराव गर्जे द्वारा संचालित मंगलमूर्ती हॉस्पिटल व मंगलमूर्ती मेडिकल स्टोअर्स चे उद्घाटन १७ जून रोजी राष्ट्रवादी काँग्रेस नेते हाजी मो युसुफसेठ पुंजानी व सेवानिवृत्त पोलीस उपअधीक्षक एम बी राठोड यांचे हस्ते करण्यात आले. 
स्थानीय पातळीवर सामान्य वर्ग व गरीब रुग्णांना आरोग्य सुविधा उपलब्ध व्हाव्यात या उदात्त दृष्टिकोनातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे चिटणीस सुधाकरराव गर्जे यांची कन्या कु श्रावणी गर्जे यांनी मंगलमूर्ती हॉस्पिटल च्या माध्यमातून ही सुविधा उपलब्ध करून दिली आहे यावेळी भगत साहेब,बाबाराजी ठाकरे व रामकृष्ण मिसाळ आदींसह बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments