Ticker

6/recent/ticker-posts

स्व. आकाश ठाकरे यांच्या वाढदिवस स्मृतीनिमित्त रक्तदान व आरोग्य शिबीर संपन्न.

           
        कारंजा : 
दरवर्षी प्रमाणे याही वर्षी स्व. आकाश ठाकरे यांच्या वाढदिवास स्मृतीदिनाचे औचित्य साधुन परिवर्तन बहुद्देशीय संस्था व संत गाडगेबाबा विचार मंच बहुद्देशीय संस्था यांच्या वतिने रक्तदान व आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले होते . याप्रसंगी अस्थिरोग तज्ञ डॉ. आकाश मोरे (MBBS D.orth.) यांनी अस्थी- विकारांच्या सर्व रुग्नाची तपासणी करून त्यांना मार्गदर्शन केले . तसेच डॉ. आदित्य पवार (MDS Orthodontics) यांनी दंत विकाराच्या सर्व रुग्नाची तपासनी व मार्गदर्शन केले.
याप्रसंगी भव्य रक्तदान शिबीर घेण्यात आले असता महिला मंडळीसह 60 रक्तदात्यांनी रक्तदान केले . रक्तदान शिबीराच्या प्रारंभी युवानेते देवव्रत डहाके यांचे हस्ते कर्मयोगी संत गाडगेबाबा, कारंजाचे विकास महर्षी माजी आमदार स्व प्रकाशदादा डहाके तथा स्व. आकाश ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन , हारार्पण व दिपप्रज्वलन करण्यात आले होते . कार्यक्रमाला शहरातील सामाजिक कार्यकर्त्यांनी व पत्रकारांनी भेटी दिल्यात . तसेच अमरावतीच्या सौ स्नेहल भारती यांनी भेट दिली .
रक्तदान  व आरोग्य शिबिराच्या यशस्वीतेकरिता परिवर्तन बहुउद्देशीय संस्था व संत गाडगेबाबा विचार मंच बहुउद्देशीय संस्था तसेच अखिल विश्व गायत्री परिवाराचे श्री. सौ. कोठेकर दांपत्य यांनी लग्नवाढदिवसा निमित्य पंडित श्रीराम  शर्मा आचार्य यांच्या अखंड  ज्योती मासीकाचे सर्व रक्तदात्यांना वितरण करून विशेष सहकार्य केलेत...

Post a Comment

0 Comments