लागत आहेत. काही ठिकाणी कृषी केंद्र चालकांकडून बियाणे व खताची चढ्या भावाने विक्री सुरु आहे. यात शेतक यांची आर्थिक लूट केली जात आहे. कृषी केंद्रचालक मनमानी किंमत आकारून खते, बियाण्यांची विक्री करत आहेत. यामुळे शेतकन्यांच्या खिशाला झळ बसत आहे. तोड़ पाहून बियाणांची व खताची विक्री होत आहे. मालाचा तुटवडा आहे तर मग ओळखीच्या लोकांना संध्याकाळी खते बियाणे कसे उपलब्ध होतात. सर्वसामान्यांना दुकानदार बियाणे शिल्लक नाही असे सांगितले जाते. जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात खत बियाणांचा कृषी दुकानदारांकडून साठवण करण्यात आली आहे. मात्र एखाद्या शेतकन्यांनी त्यांकडे खरेदीसाठी मागणी केल्यानंतर कंपनीकडूनच अद्यापही खत बियाणे उपलब्ध झाले नसल्याचे सांगितले जाते. मात्र त्यांच्याकडे असलेले छुपे गोदामाम ध्ये खतांची थप्पी मारली असतांनाही कृषी विभागाचे कुठल्याही प्रकारचे लक्ष नाही की अर्थपुर्ण व्यवहारातून दुर्लक्षच केल्याचा सवाल शेतकरी वर्गातून व्यक्त केला जात आहे.
शेतक-यांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी कृषी विभागाकडून एक समिती गठीत केली जाते. मात्र ते फक्त नावाला व दिखापूणा करण्यासाठी करण्यात येत असून शेतक-यांनी केलेल्या तक्रारीवर कुठल्याही प्रकारची कारवाई अथवा चौकशी केली जात नसल्याचे निदर्शनास येत असून तक्रार निवारण केंद्र फक्त नावालाच असल्याचे शेतकऱ्यांमधून बोलले जात आहे.

0 Comments