वाशीम:- जिल्ह्यासह महाराष्ट्रभरात ३ वर्षापुर्वी रस्ते बांधणीसाठी व दळणवळणाच्या जलदगतीसाठी १०० ते २०० वर्षे जुनी हजारो मोठमोठी झाडे केंद्र शासनाच्या रस्ते मंत्रालयाच्या आदेशाने व प्रशासनाने कचाकचा कापून काढली.
हे होत असतांना निसर्ग प्रेमी, जिल्ह्यातील जनता तसेच हा प्रश्न ऊजागर करणार्या पत्रकारांना आम्ही पुन्हा यापेक्षा जास्त झाडे लावू असे सांगण्यात आले. या फसव्या आश्वासनांमूळे सदरचे अपेक्षाधारकांनी शासन प्रशासनावर विश्वास ठेवून आपला टोकाचा विरोध थांबवला होता.
मात्र याविषयी मावळा संघटनेचे ऊपाध्यक्ष राहुलदेव मनवर यांनी आवाज ऊठवून देशाचे पंतप्रधान, केंद्रीय रस्ते व वाहतुक मंत्री, राज्यांचे मुख्यमंत्री तसेच राज्यातील सर्व मंत्री तसेच जिल्हाधीकारी वाशीम यांना निवेदन पाठवून जिल्हा प्रशासनाचे लधले असून याकडे दुर्लक्ष केल्यास जिल्हाधीकारी कार्यालयासमोर आमरण ऊपोषण करणार असल्याचे म्हटले आहे. याबाबत रस्ते मंत्रालयाला पत्र पाठवून दर २० फुटावर जास्तीत जास्त लिंबाचे झाडे लावून ते ५ वर्षे जगेपर्यंत याकडे लक्ष देण्याची विनंती केली निवेदनातून आहे.
आज याला २ वर्षे ऊलटुन रस्त्याच्या कडा ह्या झाडाविनाच दिसून येत आहेत. फार तुरळक ठिकाणी अर्थात ज्या रस्तावर २००० झाडे लावण्याचे व जगवण्याचे ऊद्दीष्ट आहे त्या रस्त्यावर शंभर दोनशेही झाडे नाहीत. या प्रकारातून केंद्र शासनाच्या रस्ते मंत्रा लयाकडून ज्या ठेकेदाराला हा ठेका दिला, त्या ठेकेदाराने थातुरमातुर झाडे लावून व पाणी टाकण्याचा दिखावा करून परिसरातील जनतेच्या डोळ्यात धुळ फेकुन कोट्यावधी रुपयाचा मलिदा लाटून रस्ते झाडाविनाच ठेवले आहेत. झाडांमूळे पर्यावरणाचा समतोल राखला झातो. प्रदुषणावर मात केल्या जाते. वास्तवीक पाहता वाशीम जिल्ह्यातील तसेच राज्य भरातील रस्त्यालगतचे शेतकरी हे मुळात झाडे प्रेमी आहेत. त्यामूळे प्रशासनाने झाडे लावले व जगवले की, शेतकरी सहजच त्या झाडांचे संगोपण करतात. मात्र शासन, प्रशासन व ठेकेदार यांनाच झाडे जगवण्याचे घेणेदेणे नसेल, भ्रष्ट्राचारासाठी दिखावाच करायचा असेल तर हा प्रश्न वाशीम जिल्ह्याचाच नाही तर महाराष्ट्रभरातील नवनिर्मीत रस्त्याने ऊन- पावसात प्रवास करतांना वेदनादायी ठरणारा आहे.
या प्रश्नाकडे मावळा संघटनेचे ऊपाध्यक्ष राहुलदेव मनवर यांनी आवाज ऊठवून केंद्र शासन व जिल्हा प्रशासनाचे लक्ष वेधले असून याकडे दुर्लक्ष केल्यास जिल्हाधीकारी कार्यालयासमोर आमरण ऊपोषण करणार असल्याचे तसेच हरीत लवाद आयोगामधे मागणी करणार असल्याचे मनवर यांनी म्हटले आहे. तसेच याबाबत रस्ते मंत्रालयाला पत्र पाठवून दर २० फुटावर जास्तीत जास्त कडू निंब, वड, पिंपळाचे झाडे लावून ते ५ वर्षे जगेपर्यंत याकडे लक्ष देण्याची मनवर यांनी विनंती केली आहे.
0 Comments