समाजातील कुप्रवृत्तींना आळा घालत त्यास प्रतिबंध करणे व अवैध धंदे करणाऱ्यांच्या मुसक्या आवळणे यासाठी वाशिम जिल्हा पोलीस दल सदैव दक्ष आहे. मा. पोलीस अधीक्षक श्री. बच्चन सिंह (IPS) यांच्या मार्गदर्शनाखाली व नेतृत्वाखाली अवैध धंदे जसे कि वरली मटका जुगार विरोधात कारवाईची सपाटा सुरु आहे. पोलीस स्टेशन स्तरावरील पथके व पोलीस अधीक्षक कार्यालयातील विशेष पथकामार्फत अवैध धंद्यांवर सातत्याने कारवाया सुरु आहेत.
पो.स्टे. वाशिम शहरचे ठाणेदार श्री. रफिक शेख यांचे आदेशाने दि.०७.०६.२०२२ रोजी पो.स्टे. वाशिम शहर येथील अंमलदार वाशिम शहरात पेट्रोलिंग करत असतांना गुप्त बातमीदारांमार्फत माहूर वेश येथे एका टीनशेडमध्ये काही इसम तिन पाणी (तिरट) नावाचा जुगार खेळत असल्याची माहिती प्राप्त झाल्यावरून सदर ठिकाणी पंचासमक्ष जाऊन तपासणी केली असता तेथे ०९ इसम तिन पाणी (तिरट) हा जुगार खेळत असल्याचे निदर्शनास आले. त्यांना ताब्यात घेऊन पंचासमक्ष अंगझडती घेतली असता त्यांचेकडून एकूण ०१.८२ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सदर ०९ जुगाऱ्यांविरुद्ध पो.स्टे. वाशिम शहर येथे अप.क्र. ४७२/२२ अन्वये कलम १२ (अ) म.जू.का. अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तर दि.०८.०६.२०२२ रोजी पो.स्टे. मानोरा येथील पोउपनि रामेश्वर नागरे यांना प्राप्त गुप्त माहितीवरून मानोरा शहरात छुप्या पद्धतीने सुरु असलेल्या वरली मटका-जुगार अड्ड्यावर धाड टाकत १७ जण ताब्यात घेतले. त्यांच्याकडून एकूण ०२.८६ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून पो.स्टे. मानोरा येथे सदर १७ इसमांविरुद्ध अप.क्र.३१८/२२ अन्वये कलम ४, ५. म. जू.का. अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.
पोलीस स्टेशन स्तरावरील कारवाई बरोबरच पोलीस अधीक्षक कार्यालय, वाशिम येथील विशेष पथकही अवैध धंद्यांवर कारवाई करण्यात अग्रेसर आहे. पो. स्टे, शिरपूर हद्दीतील ग्राम पिंपरी सरहद येथे दि.०७.०६.२०२२ रोजी सायंकाळी गावाजवळील शेतात मोठ्या प्रमाणात चालणाऱ्या जुगार अड्ड्यावर सपोनि. भारत लसंते यांच्या विशेष पथकाने धाड टाकली. त्यामध्ये १५ जुगाऱ्यांना ताब्यात घेत त्यांच्याकडून तब्बल १२.६२ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. कुठेही अवैध धंदे सुरु असल्यास त्याची माहिती तत्काळ पोलीस विभागास देण्याचे आवाहन वाशिम जिल्हा पोलीस दलातर्फे करण्यात येत आहे.
0 Comments