■ शहरवासीयांची मानसुनपुर्व नाले सफाई करण्याची मागणी
मंगरुळपीर / :- मानसुन पुर्व नाले गटार सफाई सह,पावसाळ्यातील पाण्याची विल्हेवाट ही नगर परिषदेच्या वार्षिक नियोजनात, मात्र भ्रष्टाचाराचे आरोपात मुख्याधिकारी नसल्याने, येथे कुणी वाली नसल्यासारखे, व प्रशासकाचा पाहिजे तेवढा प्रभाव पडत असल्याने, येत्या काळात नागरिकांना आरोग्यासह मोठ्या संकटास सामोरे जावे लागनार यात शंका नाही,त्यामुळे मानसुन पुर्व नाले सफाईची मागणी नागरीकातुन होत आहे.
शहरातील विविध भागात अनेक मोठमोठी नाले असुन पावसाळ्यात येनाऱ्या पावसाचा प्रवाह हा सुरळीतपणे नाल्यामार्गे नदीच्या प्रवाहात जाण्यास शहरातील विविध भागातील नाले सफाई महत्वाची,मात्र आपल्या सोयीचे राजकारण सध्या नगर परिषद मध्ये होत असुन आपल्या सोयीनुसार कर्मचाऱ्यांना हाताशी घालुन नगर परिषदेच्या पैशाची ऊधळन केल्या जात असल्याचे निर्दशनास येत आहे, अशोक नगर येथील मागील वर्षी पावसाळ्यामध्ये सर्वकडे डबके साचत होते,या साचलेल्या डबक्याच्या दुर्गंधीमुळे नागरिकांना बराच त्रास होत होता व यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले होते.आणी डेंग्यू सद्रुष्य रूग्ण आढळले होते, यावेळी संबंधित विभागाला पूर्वसूचना देऊन होणाऱ्या सांडपाण्याची व्यवस्था व्यवस्थित करावी अशी विनंती नागरिकांकडून करण्यात आली होती,आज पर्यंत संबंधित विभागाने कुठलीही व्यवस्था केलेली नसून आजही नागरिकांच्या जिवाला धोका निर्माण झालेला आहे पावसाळा तोंडावर येऊन ठेपला असून संबधित विभागाने कुठलेही काम केलेले नसून नुसते पहायचे काम संबंधित अधिकारी व लोकनेते करत आहे. यामुळे संबंधित लोक नेत्यांना मतदान कराव कि नाही कराव असा प्रश्न नागरिकांना पडला आहे,त्यामुळे येत्या काळात निवडणुकीत मतदाता नवीन पर्याय शोधनार हे निच्छीत,अशोक नगर चे तात्काळ काम करून द्यावे याकरिता पाठपुरावा नेहमी इरफान शेख सामाजिक कार्यकर्ते हे करत असतात,येणाऱ्या सहा दिवसात अशोक नगरच्या नागरिकांच्या मुलभूत सुविधा चे काम तात्काळ करण्यात यावे अन्यथा सबंधित अधिकारी कर्मचारी यांचे विरूद्ध गांधीगीरी आंदोलन केल्याशिवाय नागरिक गप्प बसणार नाही अशी भूमिका अशोक नगरच्या नागरिकांनी घेतली आहे.
0 Comments