Ticker

6/recent/ticker-posts

राणा दाम्पत्याला मुंबई पोलिसांची नोटीस, ८ जूनला चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश

अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांना मुंबई पोलिसांनी नोटीस बजावली आहे. येत्या ८ जूनला त्यांना चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच, राणा दाम्पत्याविरोधात मुंबई पोलीस दोषारोपपत्र दाखल करणार असल्याची माहिती आहे.

हनुमान चालीसा प्रकरणावेळी जेव्हा पोलीस राणा दाम्पत्याच्या घरी गेले होते. त्यावेळी त्यांनी पोलिसांशी हुज्जत घातली होती. आम्ही खासदार आमदार आहोत तुम्ही आम्हाला असं थांबवू शकत नाही, असंही ते म्हणाले होते. त्याप्रकरणी सरकारी कामात अडथळा म्हणून एक गुन्हा दाखल झाला होता. त्या संबंधित ही नोटीस मुंबई पोलिसांनी त्यांना बजावली आहे. याप्रकरणी येत्या ८ जून रोजी राणा दाम्पत्याला वांद्रे न्यायालयात हजर राहावे लागणार आहे.राणा दाम्पत्याला वांद्रे येथील न्यायालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे आमदार रवी राणा हे राज्यसभेसाठी मतदान करणार की नाही अशी चर्चा आता जोर धरू लागली आहे.

Post a Comment

0 Comments