२१ जून रोजी जगभरात योग दिवस साजरा केला जातोव संयुक्त राष्ट्रांनी याला मान्यता दिली आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सप्टेंबर २०१४ मध्ये झालेल्या संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत २१ जून हा दिवस 'आंतरराष्ट्रीय योग दिन' म्हणून साजरा करण्यात यावा, असा प्रस्ताव मांडला होता. संयुक्त राष्ट्रांच्या १९३ देशांपैकी १७५ देशांच्या सहप्रतिनिधींनी या प्रस्तावाला पाठिंबा दिला होता.
सुरक्षा आयोगाचे कायमस्वरूपी सदस्य असलेले अमेरिका, इंग्लंड, चीन, फ्रान्स, रशिया यासारखे देशही या प्रस्तावाचे सहप्रतिनिधी आहेत. यावर विस्तृत चर्चा झाल्यानंतर डिसेंबर २०१४ मध्ये या दिनाला मान्यता देण्यात आली. आज आपण सर्वजण कोरोना नावाच्या भयाण संकटाचा सामना करत आतापर्यंत आलो आहोत करोना रुग्ण यांचे प्रमाण कमी झाले मात्र अद्याप ते सावट संपले असे नाही . या संकटातून सुखरूप बाहेर पडायचे असल्यास नागरिकांची रोग प्रतिकार शक्ती वाढविणे हा एकमेव पर्याय सर्व वैद्यकीय तज्ञ सांगत आहेत. हजारो वर्षां पासून भारतात योग, प्राणायाम हा उत्तम आरोग्याचा मंत्र सांगितला आहे. या योग शिबीरातील सर्वाना केळी व बिस्किट पुडे तसेच योगाभ्यास ची पुस्तके वाटप करण्यात आली .या योग यज्ञ साठी योग प्रशिक्षक म्हणून श्वेता पाटील या उपस्थित होत्या .तसेच त्रिरत्न महीला संस्थेच्या कालींदिताई पाटील, प्रकाश पाटील व मनोबल केंद्रातील सर्व कार्यकर्ते सहभागी होवून योग यज्ञ शिबीर यशस्वी केले .
0 Comments