दि.०६.०६.२०२२
वाशिम पोलीस दलामध्ये १६ डिसेंबर, २०२१ पासून डायल ११२ हा महत्वाकांक्षी प्रकल्प सुरु करण्यात आला असून या प्रकल्पाचा उद्देश्य पिडीत जनतेला आधुनिक साधन तंत्रज्ञानाच्या मदतीने कमीत कमी वेळेत पोलीस मदत पोहोचविणे हा आहे. वाशिम पोलीस दलामध्ये या प्रकल्पाकरिता २० चारचाकी वाहने व २१ दुचाकी वाहने कार्यरत असतांना दि. २१.०५.२०२२ पासून पोलीस प्रशासनाने नवीन ०४ चारचाकी वाहने यामध्ये सामील करून ते पो.स्टे. वाशिम शहर, वाशिम ग्रामीण, रिसोड व कारंजा ग्रामीण येथे पुरविली गेली आहेत. सर्व वाहनांवर डायल ११२ प्रकल्पाचे प्रशिक्षण घेतलेला प्रशिक्षित स्टाफसुद्धा तैनात करण्यात आला आहे.
डायल ११२ हा प्रकल्प कार्यान्वित झाल्यापासून सर्वात जास्त महिलांना संबंधित एकूण ७९९. गुन्ह्यांसंबंधीत ६७२, चौकशी करिता ५०४ तसेच अपघातासंबंधी २६९ कॉल प्राप्त झालेले आहेत. सर्वात जास्त कॉल पो.स्टे. वाशिम शहर येथून ५२८, पो.स्टे. रिसोड ३७४, पो.स्टे. मालेगाव ३२०, पो.स्टे. मंगरूळपीर २९३ असे कॉल प्राप्त झाले असून त्यांना कमीत कमी वेळात प्रतिसाद देण्यात आला आहे. आजपावेतो एकूण ३०३७ कॉल डायल १९२ ला प्राप्त झाले असून संपूर्ण जिल्ह्याचा प्रतिसाद वेळ हा सर्वात कमी म्हणजे १५ मिनिटे ४८ सेकंद इतका आहे. वाशिम घटकातील पो.स्टे. वाशिम शहर यांचा प्रतिसाद वेळ हा सर्वात कमी ११.०६ मिनिटे असून ते प्रथमस्थानी आहे. त्यानंतर पो.स्टे. मंगरूळपीर १४.१८ मिनिटांसह द्वितीय स्थानी तर पो.स्टे. मालेगाव व पो.स्टे. रिसोड हे १५.०४ मिनिटांसह तृतीय स्थानी आहे. कॉल येण्याचे प्रमाण सायंकाळी ०६.०० वा. पासून ते रात्री । .वा. पावेतोदरम्यान सर्वाधिक आहे. ११.००. अश्याप्रकारे कॉल प्राप्त होणान्या ठिकाणची माहिती घेऊन संवेदनशील ठिकाणी पोलीस दलाचे वतीने डायल १९२ वाहनाकरीता वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये फिक्स पॉइंट लावून गस्तीचा विभाग ठरवून दिलेला आहे. . त्यामुळे पिडीत व्यक्तींना कमीतकमी वेळेत प्रतिसाद मिळत असून गुन्हेगारीवर कृत्यांना आळा बसला आहे. त्याचाच परिणाम म्हणून वाशिम जिल्हा डायल ११२ चा प्रतिसाद वेळ हा संपूर्ण महाराष्ट्रातून सर्वात कमी असून प्रभावीपणे नागरिकांना पोलीस मदत मिळत आहे.
त्याअनुषंगाने आज दि.०६.०६.२०२२ रोजी पोलीस अधीक्षक कार्यालय, वाशिम येथील सभागृहात डायल ११२ च्या चमूचे कौतुक करण्यासाठी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रमाला • मा. ना. श्री. शंभूराजे देसाई, पालकमंत्री, जिल्हा वाशिम व मा. श्री. चंद्रकिशोर मोना, विशेष पोलीस उपमहानिरीक्षक, अमरावती • परिक्षेत्र हे व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे तर मा. श्री. धन्मुकराजन एस., जिल्हाधिकारी, वाशिम व मा. श्री. बच्चन सिंह (IPS), पोलीस अधीक्षक, वाशिम हे पोलीस अधीक्षक कार्यालयातील सभागृहात हजर होते. तसेच वाशिम जिल्ह्यातील सर्व पो.स्टे. प्रभारी अधिकारी हे व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे सदर सोहळ्यास उपस्थित होते. यावेळी सर्वप्रथम मा. पोलीस अधीक्षक श्री. बच्चन। सिंह (IPS) यांनी डायल ११२ बाबत उत्कृष्ट सादरीकरण करून प्रतिसाद वेळ कमी करण्यासाठी काय उपाययोजना केल्या याबद्दल माहिती दिली व भविष्यात डायल ११२ चा प्रतिसाद वेळ हा १० मिनिटांपेक्षा कमी करण्याचा निर्धार व्यक्त केला. त्यानंतर टीम डायल ११२ च्या हस्ते केक कापून सदर कामगिरीचे कौतुक केले. डायल ११२ मध्ये कर्यरत असलेले महिंद्रा डिफेन्सचे तांत्रिक सहायक अभियंते श्री. वैभव देशमुख, श्री. मोहन लोधी व श्री. जगदीश आरु यांचे पुष्पगुच्छ. गिफ्ट व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी मा.ना.श्री. शंभूराजे देसाई, पालकमंत्री जिल्हा वाशिम यांनी टीम डायल ११२ चे अभिनंदन केले व भविष्यातदेखील अशाच कामगिरीची अपेक्षा व्यक्त केली. डायल ११२ प्रकल्पामध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये प्रतिसाद वेळेत वाशिम जिल्हा प्रथम येण्यासाठी सपोनि. मनीषा तायडे व त्यांच्या डायल ११२च्या टीमने अथक परिश्रम घेतले.
0 Comments