प्रतिनिधी:-
सचिन राणे, शेलुबाजार
०५ जून हा दिवस जागतिक पर्यावरण दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. याच दिवसाचे औचित्य साधून मेळघाट व्याघ्र प्रकल्पाने वाशिम-अकोला जिल्ह्यात पसरलेल्या काटेपूर्णा अभयारण्यात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे आयोजन मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे मुख्य वनसंरक्षक तथा क्षेत्र संचालक ज्योती बॅनर्जी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून डी. पी. निकम वनरक्षक सामाजिक वनीकरण विभाग अमरावती हे होते.
यावर्षीच्या जागतिक पर्यावरण दिनाचा विषय ‘‘ओन्ली वन अर्थ’’ या विषयांतर्गत विविध मान्यवरांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. सोबत काटेपूर्णा अभयारण्याचे माहिती फलक व पोस्टर चे विमोचन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. प्रथम सत्र डी. पी. निकम वनरक्षक सामाजिक वनीकरण विभाग यांनी निसर्ग चक्र व मानवाने केलेल्या त्याची हानी व उपाय योजना या विषयावर संवाद साधला. अक्षय गजभिये उपवन रक्षक बुलढाणा यांनी अस्वल यांच्यासोबत होत असलेल्या मानव प्राणी संघर्ष व उपाय योजना याविषयी सविस्तर माहिती सादरीकरणाद्वारे दिली. भारतीय वन्यजीव संस्थेचे संशोधक जयदीप पाटील यांनी मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील वाघाचे होत असलेले सत्तांतर याविषयी महत्त्वपूर्ण व रोमांचक अनुभव सादरीकरणाद्वारे मांडले. डॉ. मिलिंद शिरभाते प्राध्यापक, यांनी लोकसहभागातून पर्यावरण संवर्धन व संरक्षण या संदर्भात माहिती दिली. पवन जाधव वनपरिक्षेत्र अधिकारी यांनी काटेपूर्णा अभयारण्या चे व्यवस्थापन याविषयी सादरीकरण केले, तर प्रफुल सावरकर उपजीविका तज्ञ मेळघाट व्याघ्र संवर्धन प्रतिष्ठान यांनी लोणार वन्यजीव अभयारण्य ची ओळख या विषयी सादरीकरण केले. अकोला अकोला प्रदेशीक व सामाजिक तसेच बुलढाणा प्रादेशिक विभागातील वने व वन्यजीव संवर्धन व संरक्षण या क्षेत्रात उत्तम कार्य केलेले वन अधिकारी, वन कर्मचारी, वन मजुर तसेच इको गाईड व या या क्षेत्रात कार्यरत अशासकीय संस्था, अकोला येथील निसर्ग संस्था, व साळुंका महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी यांना सन्मानित करण्यात आले.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्योती बॅनर्जी यांनी अध्यक्षीय भाषणामध्ये सर्व सन्मान प्राप्त वन कर्मचारी यांचे अभिनंदन केले. व पर्यावरण संवर्धन व संरक्षण या आपल्या सोबत सर्व समाजाचे कार्य आहे. यामध्ये शाळा महाविद्यालय विद्यार्थी गावकरी यांचा समावेश राहील तेव्हा शाश्वत पर्यावरण राखले जाईल, असे मनोगत व्यक्त केले.
जागतिक पर्यावरण दिवस साजरा करण्यात यशस्वी जबाबदारी पार पाडण्यासाठी मुख्य अधिकारी काटेपूर्णा अभयारण्य व त्यांच्या टीमने अथक परिश्रम घेतले मेळघाट व्याघ्र संवर्धन प्रतिष्ठान चे स्वप्नील बांगडे व योगेश तापस वनपरिक्षेत्र अधिकारी मेळघाट लोखंडे वनपरिक्षेत्र अधिकारी ज्ञानगंगा अभयारण्य यांनी मोलाचे सहकार्य केले, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रकरण सावरकर यांनी केले.
याप्रसंगी अकोट वन्यजीव विभागाचे उपवनसंरक्षक नवकिशोर रेड्डी, गुगलाम वन्यजीव विभागाचे उपवनसंरक्षक सुमित सोळंके, अकोला प्रादेशिक विभागाचे उपवनसंरक्षक के. अर्जुना, बुलढाणा प्रादेशिक विभागाचे उपवनसंरक्षक तसेच अकोला वन्यजीव विभागाची अतिरिक्त जबाबदारी असलेले अक्षय गाजभिये, वनरक्षक निलेश खोडके, अविनाश वानखेडे, व इतर काटेपुर्णा अभयारण्याचे वनकर्मचारी तसेच आदी मान्यवर उपस्थित होते.
0 Comments