महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेतलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल बुधवारी ऑनलाईन जाहीर झाला. या परीक्षेत नेत्रदीपक यश मिळवलेल्या चार पैकी तीन मुली असून, एकमुलगा आहे. अनेकांनी अभ्यास करतानाही छंद जोपासत परीक्षेत बाजी मारली.
विधी जाखोटीया तणाव आल्यानंतर कुटुंबीयांशी चर्चा केली. अभ्यासात सातत्य ठेवले अन ९८.३३ टक्के गुण मिळवले. मूळची मंगरूळ नाथ रहिवासी विधी सुखदेव जाखोटीया १० पर्यंत मंगरूळ नाथ विद्यालय, नंतर ११ आणि 12वीं एल आर टी अकोला येथे वाणिज्य शाखेतील विद्यार्थिनीला ६०० पैकी ५९० गुण मिळाले. घरातच शिक्षणासाठी पोषक वातावरण. सहा ते सात तास अभ्यास करीत ती खासगी शिकवणी वर्गाला नियमित जात होती. सनदी लेखापालची (चार्टर्ड (अकाऊंटट) तयारी करणाऱ्या विधीला ताण आल्यास तो कुटुंबीयांशी चर्चा करायची. अभ्यासाची आवड असलेल्या विधीला आव्हानात्मक क्षेत्रात कार्य करणे आवडते. खडतर कामाची तिचा इच्छा असते. एकीकडे सनदी लेखापालाचे वर्ग करतानाच दुसरीकडे बारावीचा अभ्यास सुरू होता. गतवर्षी डिसेंबरनंतर सनदी लेखापालाचा अभ्यासक्रम बाजूला ठेवत तिने बारावीच्या अभ्यासावर लक्ष केंद्रीत केले. मोठी बाजी मारली अभ्यास करून स्वप्न साकार करण्यासाठी अनेक समस्यांना तोंड देत
९८.३३ टक्के गुण मिळवले. सर्वतोपरी तिचे कौतुक होत आहे. वाशिम खबर आवाज महाराष्ट्राच्या वतीने बारावी उत्तीर्ण सर्व विद्यार्थी विद्यार्थिनींचे मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन आणि पुढील शैक्षणिक वाटचालीस मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा...
0 Comments