तुटलेली प्रत्येक गोष्ट जोडण्यास बाबा नीच मदत केलीत झालेल्या चुकांमधून जगण्याची नवी शिकवण दिली गरजूवंतांच्या मदतीसाठी धावून जाण्याची त्यांनीच मला शिकवण दिली त्याबद्दल मी बाबा तुमचा आभारी आहे. कर्मयोगी बापूरावजी चौधरी एनजीओ चे संस्थापक अध्यक्ष, माऊली प्रतिष्ठानचे संचालक श्री शेषरावजी बापूरावजी चौधरी यांचा जन्म चेहेल या गावी झाला शेतकरी कुटुंबातून जीवन प्रवास सुरू झाला दहावी झाल्यानंतर नगरपरिषद ला पाणीपुरवठा वसुली अधिकारी म्हणून रिटायर होईपर्यंत कार्य केले मित्रमंडळीची मोठी फळी सुद्धा उभी केली गावात समाजात पंचकोशीत प्रतिष्ठित शेतकरी म्हणून आमचे आजोबाची ओळख होती प्रेमळ दयावान आपुलकीची माणसं जोडण्याचे कार्य आजोबांनी केले आणि आज माझे वडील करत आहे. कोरोना सारख्या आजाराच्या काळात भीक मागून खाणाऱ्यांना पोटभर कसे जेवन देता येईल एनजीओच्या माध्यमातून कशाप्रकारे जनसामान्यांची सेवा करता येईल हे माझ्या वडिलांनी मला शिकवले पांडुरंगाचे भक्त असल्यामुळे दिन दुबळ्यांची पिडीतांचे कसे अश्रू पुसता येईल असे अंतकरणवादी माझे बाबा चांगले वाईट प्रसंग जीवनात येत असतात घाबरून न जाता खंबीरपणाने उभे राहावे हेही त्यांनी शिकवले काही समाजकंटकांनी त्यांचा विरोधीही केला परंतु त्यांनी आपले कर्तव्य आणि कार्य कधीच सोडले नाही.
मला माझ्या परिवाराला सावलीत ठेऊन उन्हात जळत राहीले, बाबांच्या रूपात मी साक्षात पांडुरंग पाहिले. अशा माझ्या बाबांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा व मानाचा मुजरा. बॅनर पोस्टर अण्णा ठाई खर्च न करता वृक्षारोपण करून आज वाढदिवस साजरा करण्यात आला. माझे ईस्ट मित्र चाहते नातेवाईकांनी माझ्या वडिलांना दिलेल्या शुभेच्छा च्या वर्षावामुळे चौधरी परिवार आपल्या सर्वांचे मनापासून आभार मानतो आणि आपल्या सर्वांचे प्रेम आमच्या कुटुंबावर असल्यामुळे आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद प्रत्यक्ष अप्रत्यक्ष आपण सर्वांनी शुभेच्छा दिल्या आपल्या सर्वांचे अंतकरणापासून आभार
0 Comments