शेख नवेद ( ऑटो चालक) व इरफान शेख (सामाजिक कार्यकर्ते) हे करणार मासे पकडो व खड्ड्यामध्ये बेशरम चे झाड लावून आंदोलन
मंगरूळपिर शहरातील संत बिरबलनाथ महाराज ते अकोला चौक रस्ता गेली अनेक वर्षांपासून खड्यात गेला असून या रस्त्याने ये जा करताना नागरिकांना तारेवरची कसरत करावी लागते असून अनेकदा अपघात घडले या रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी ऑटोरिक्षा चालक संघटना शहराध्यक्ष शेख नवेद यांनी दि 21 रोजी न प मुख्याधिकारी याना दिलेल्या निवेदनातुन केली आहे
सदर निवेदनाचा आशय असा की ,संत बिरबलनाथ महाराज ते अकोला चौक हा रस्ता गेली अनेक वर्षांपासून नादुरुस्त अवस्थेत असून या ये जा करणाऱ्या वयोवृद्ध व आजारी नागरिकांना मोठया प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे परिणामी नागरीकाना मणक्याचे आजारांना सामोरे जावे लागत आहे तर या रस्त्याने जाणारे वाहने पुर्णतः खिळखिळी होत आहे तसेच या रस्त्यावरून धार्मिक महोत्सवात साजरा करताना मिरवणूक काढली जाते यावेळी भाविकांना मोठा त्रास सहन करावा लागतो तसेच या मार्गावर जि प माध्यमिक शाळा, महाविद्यालयात, तसेच सिद्धार्थ विद्यालय या शाळा आहेत या शाळेतील विध्यार्थ्यांना चालताना तारेवरची कसरत करावी लागते याशिवाय या दुरुस्तीसाठी दि 7 /1/2022 रोजी पालिकेला लेखी निवेदन दिले मात्र अद्यापही या निवेदनाची दखल घेण्यात आली नाही या नादुरुस्त रस्त्यामुळे नागरिकात नगरपालिकेच्या गलथान कारभाराप्रति तीव्र रोष व्यक्त केल्या जात आहे ही बाब लक्षात घेऊन तात्काळ रस्ता दुरुस्ती करण्यात यावी अन्यथा या रस्त्यावरील खड्यात मासे पकडो आंदोलन करून तसेच खड्यात बेशरमचे झाड लावण्यात येईल असा इशारा शेख नवेद यांनी दिला आहे या निवेदनावर शेख इरफान,सागर उखळकर आदीच्या स्वाक्षऱ्या आहे
0 Comments