Ticker

6/recent/ticker-posts

पाटिल महाविद्यालयात निर्भया पथकाची स्थापना


स्थानिक -रिसोड येथील स्व.पुष्पादेवी पाटिल कला व विज्ञान महाविद्यालयात  संस्थाध्यक्ष मा. बाबाराव पाटिल , सचिव मा.अमित भाऊ पाटिल , कार्यकारी अधिकारी डॉ.जे.बी. देव्हडे ,प्राचार्य डॉ.ए. डि.बदर यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय सेवा योजना, महिला सक्षमीकरण कक्ष व अँटी रॅगिंग सेल आणि पोलीस स्टेशन रिसोड यांच्या संयुक्त विद्यमाने निर्भया पथकाची स्थापना करण्यात आली. याप्रसंगी रिसोड पोलीस स्टेशनचे श्री. देवेंद्रसिंह ठाकुर (ठाणेदार) कु.शिल्पा सुरगुडे  (पीएसआय) यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती होती. कु.शिल्पा सुरगुडे मॅडम यांनी याप्रसंगी बोलताना महिलांवरील अत्याचार थांबविणे,महिलांना तात्काळ मदत पुरवणे व महिलांमध्ये आपण सुरक्षित असल्याची भावना निर्माण करणे इत्यादी या पथकाची उद्दिष्टे असल्याचे विचार व्यक्त केले. कार्यक्रम प्रसंगी डॉ.प्रवीण हाडे (क्षेत्रीय समन्वयक) प्रा.टि.सी.भोयर (माजी कार्यक्रमाधिकारी) प्रा.केशव कोकाटे रासेयो कार्यक्रम अधिकारी यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.कु.पल्लवी देशमुख, आभार प्रदर्शन डॉ.आम्रपाली भगत रासेयो महिला सहकार्यक्रम अधिकारी यांनी केले. होती.महाविद्यालयातील प्राध्यापक प्राध्यापिका शिक्षकेतर कर्मचारी वृंद व विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments