Ticker

6/recent/ticker-posts

पाटिल महाविद्यालयात जोहान ग्रेगोर मेंडेल द्विशताब्दी जन्मदिन संपन्न


रिसोड 

येथील स्व.पुष्पादेवी पाटिल कला व विज्ञान महाविद्यालयात  दिनांक २० जुलै २०२२ रोजी जोहान ग्रेगोर मेंडेल द्विशताब्दी जन्मदिन साजरा करण्यात आला. संस्थेचे अध्यक्ष मा.  बाबाराव पाटिल साहेब, सचिव मा. अमित भाऊ पाटिल साहेब , कार्यकारी अधिकारी व माजी प्राचार्य डॉ.जे.बी. देव्हडे व प्र.प्राचार्य डॉ.ए. डी.बदर यांच्या मार्गदर्शनाखाली वनस्पतीशास्त्र विभाग व वनस्पतीशास्त्र अभ्यास मंडळ अंतर्गत सदर कार्यक्रम साजरा करण्यात आला. वनस्पती शास्त्र विभाग प्रमुख डॉ.के.एम रंजळकर यांनी फादर ऑफ जेनेटिक्स म्हणून जगप्रसिद्ध असलेले मेंडेल यांची जीवन पद्धती व त्यांचे कार्य, संशोधन या बाबतीत माहिती दिली. तसेच  डॉ.ए.पी.भगत यांनी  मेंडेलियन    जेनेटिक्स आणि पोस्ट मेंडेलियन जेनेटिक्स बद्दल मार्गदर्शन केले.  पशु - पक्षी, वनस्पती यांच्यातील अनुवंशिकता आणि विविधता याचे महत्व  या अनुषंगाने दरवर्षी प्रमाणे हा कार्यक्रम उत्साहाने साजरा करण्यात येतो .या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु कोमल कवडे, प्रस्तावना कू.साक्षी इंगळे , आभार प्रदर्शन कू. अस्मा परवीन पठाण यांनी केले.सदर कार्यक्रमाचे आयोजन वनस्पतीशास्त्र विभाग प्रमुख डॉ.के.एम.रंजलकर,आणि डॉ. ए.पी.भगत यांनी केले. तसेच प्रयोग शाळा परिचर जे.एम बोडखे यांचे सहकार्य लाभले. या कार्यक्रमास बहुसंख्य विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थिती होते.

Post a Comment

0 Comments