मिळणार आहे.
म्हणजे नामदेव पायरी, महाद्वार घाट, मंदिर परिसर, नगरप्रदक्षिणा अशा ठिकाणी वारकरी वेशात पोलीस कर्मचारी तैनात ठेवणार आहेत. गर्दीच्या ठिकाणी हे पथक गर्दी कमी करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. तसेच प्रांत कार्यालयाने पंढरीची वारी हे अॅप तयार केले आहे. या माध्यमातून पालखी मार्गावर पाण्याची व्यवस्था, शहरात वाहनतळ, आरोग्य सेवा आदी माहिती या अॅपच्या माध्यमातून मिळणार आहे.
राज्यात अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे, तर काही ठिकाणी आता पाऊस जोर धरत आहे. त्यामुळे अनेक भाविक यात्रेपूर्वी पंढरीत येऊन देवाचे दर्शन घेऊन पुन्हा गावी परतू लागले आहेत. गेल्या चार-पाच दिवसांत रोज श्री विठ्ठलाचे ४५ हजार भाविक पदस्पर्श तर ५० हजार भाविक मुखदर्शन घेऊन गेले आहेत. गुरवारी पदस्पर्श दर्शन रांग ही पत्राशेड क्रमाक ५ मध्ये आहे. शेवटच्या भाविकाला दर्शन घेण्यासाठी जवळपास ६ ते ७ तास लागत असल्याची माहिती प्रांताधिकारी तथा श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी गजानन गुरव यांनी दिली आहे. एकंदरीत आता भाविक मजल दरमजल करीत दर्शनाची आस घेऊन येत आहेत. त्यामुळे दोन वर्षांनंतर पुन्हा पंढरी गर्दीने आणि टाळमृदुंगाच्या जयघोषाने दुमदुमून निघणार आहे.
अर्थकारणाल चालना
भाविक मोठय़ा संख्येने दर्शनास येत आहेत, या आधी म्हणजे सप्तमीच्या दिवशी एवढी गर्दी झाली नाही. भाविक दर्शन करून खरेदी करून आपल्या गावी जात आहेत. त्यामुळे निश्चितच व्यापार चांगला झाला आहे. आता महत्त्वाच्या दिवसात भाविक किती येतात ते पाहावे लागेल. सध्या तरी समाधानी आहोत, असे व्यापारी राजेश नलबिलवार यांनी सांगितले.
भाविकांनी मुखपट्टीचा वापर करावा!
आषाढी वारीसाठी पालिकेने यात्रा कालवधीत दिवसा तसेच रात्री स्वच्छता केली जाणार आहे. गर्दीच्या ठिकाणाहून कचरा गोळा करण्याची व्यवस्था केली आहे. चंद्रभागा नदीच्या पैलतीरावरील ६५ एकर जागेत यंदा नव्याने ४०० जागा तयार केल्या आहेत. ज्या मुळे जास्तीत जास्त भाविक या ठिकाणी मुक्काम करू शकतील असे नियोजन आहे. ठिकठिकाणी तात्पुरते शौचालय त्याच ठिकाणी पाण्याची व्यवस्था केली आहेत. भाविकांनी स्वतच्या आरोग्यासाठी मुखपट्टीचा वापर करावा, असे आवाहन पालिकेचे मुख्याधिकारी अरिवद माळी यांनी केले आहे.
0 Comments