Ticker

6/recent/ticker-posts

आईच्या निधनानंतर मुलीने धर्माचरण केले. अंतिम संस्कार रूढी बदलानेमीनलताईने समाजासमोर आदर्श ठेवला आहे.



एक पाऊल नविन रूढी बदलाचे 

सांगली जिल्हा तासगाव 
  वृद्धापकाळाने कै. सौ. कमल कृष्णनाथ कोळेकर,वर ८६ यांअचे - सोमवार दि. ०४/०७/२०२२ 
सायंकाळी ७.२१ ला निधन झाले. त्यात कमलताई यांना मुलगा नसल्याने  मीनलताईनी प्रेत उचलून ,शिकाळ धरून  मुखाग्नी देण्यासाठी पुढे आली. 
कमलताई यांच्या  अंत्ययात्रेसोबत स्मशानाकडे गेली. त्याठिकाणी गावातील मंडळी, नातेवाईक यांच्या समवेत  प्रेतास अग्नी दिला. या घटनेमुळे गावात व आजूबाजूच्या परिसरात महिलांनी केलेल्या या कार्याचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. संपत्ती, पैसा, घर, शेती यांचा उत्तराधिकारी पुरुष अशी असा समज मोडीत काढत या तिन्हीही बहिणींनी आज नवा आदर्श निर्माण केला आहे.मुलांपेक्षा मुली कमी नाहीत -मुलगा नसेल तर मोक्ष प्राप्त होत नाही, पाणी कोण पाजणार? मुलाने मुखाग्नी दिला तरच उद्धार होतो, असे अनेक गैरसमज ग्रामीण भागात आहेत. याला छेद देत या तीन्ही मुलींनी आईचे अंत्यसंस्कार केला आहे. परंपरेची बंधन झुगारून धाडस दाखवणाऱ्या या बहिणीचे कौतुक होत आहे. तसेच मुलापेक्षा मुलगी देखील काही कमी नाही हे दाखवून देत सर्व जबाबदाऱ्या मुलींनी पार पाडल्या आहेत.वंशाचा दिवा नसेल तर ( पणत्या) मुलीही उतराधीकारी होवू शकतात.
काही रुढी कालपरत्वे बदलल्या पाहिजेत .आई वडिलांच्या मृत्यूनंतर मुलगा वंशाचा दिवा म्हणून तोच सर्व कार्य विधी पार पाडत असतो .परंतु ज्यांना मुलगा नसेल, त्यांना इतर कोणीही अग्नी देतात. दशपिंड पुजा, शिकाळ धरणं, अस्थी विसर्जन, इत्यादी विधी जर, त्यांना मुली असतील. त्या मुलींनी केली तर त्यात गैर काय म्हणून माझ्या आईचे कार्यविधी नुकतेच झाले. त्यामध्ये अर्थी उचलण्यापासून अंतयात्रेतून शिकाळ 
धरणे, भडागणी देणे. आणि आईच्या अस्थी आळंदीला विसर्जन करण्याचे कार्य आम्ही मुलींनी केले. ते योग्य का अयोग्य मला माहित नाही परंतु सर्व रुढी या मानवनिर्मित आहेत . त्या काळानुसार बदलण्यात याव्या असा माझा आग्रह  होता. आईचे निधन झाले त्या दिवशी जे जे मुलगा करतो ते ते करण्याचा मिनलताईने  प्रयत्न केला .त्यामध्ये माझ्या समाजाने नातेवाईकांनी कोणताही अडसर आणला नाही. त्या सर्वांची मी ऋणी आहे. रात्री साडे बाराला स्मशानभूमीतून आम्ही बाहेर पडलो . विशेष गोष्ट म्हणजे.या कार्यात माझी भूमिका पाहून आमच्या शेजारच्या ओम शांती सेंटरच्या निवेदिता बहेनजीही सोबतीला आल्या .
     माझ्या आईचे विचार, ती सामाजिक कार्यकर्ती ,एक हाडाची शिक्षिका, शिक्षण संस्थेची संचालिका ,आणि स्त्री नेतृत्व करणारी ती  एक समाजशील स्री होती. मला ती नेहमी म्हणायची तू आमचा मुलगा असतीस तर बरं झालं असतं म्हणून मी तीचा त्यादिवशी मुलगा झाले.आणि  तिच्या या सर्व पुरोगामी विचाराबरोबर जाण्याचा मी प्रयत्न केला. तसेच मला या समाजाला ,समाजातील मुलींना  आवाहनात्मक सांगण्याचे मी एक धाडस करते जे स्वतःला पटेल आणि योग्य असेल तो निर्णय योग्य वेळी घेणे हे कुठेही चुकीचे नाही आपल्या आई-वडिलांनी आपल्याला जन्म दिला त्याचे सार्थक करण्याची संधी योग्य वेळी मिळाली. माझ्या या कार्याने 
     नक्कीच माझ्या आईच्या आत्म्याला शांती मिळेल. असा मला विश्वास आहे
   सौ. मिनल अविनाश कुडाळकर सांगली  ८९९९६२२००९

Post a Comment

0 Comments